राफेल घोटाळ्याचा निकाल जनता दरबारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:25 PM2018-12-24T22:25:16+5:302018-12-24T22:25:50+5:30

राफेल विमान खरेदीत ४१ हजार २०५ कोटींवर दरोडा सत्ताधारी भाजपने घातला. काँग्रेसने यावर वारंवार संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) ची मागणी केली. मात्र, मोदी सरकार ते फेटाळत आहे. आता या घोटाळ्याचा निकाल देशातील जनताच लावेल, असे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले.

In the public debate, the results of the Rafael scam | राफेल घोटाळ्याचा निकाल जनता दरबारातच

राफेल घोटाळ्याचा निकाल जनता दरबारातच

Next
ठळक मुद्देराहुल बोंद्रे : विमान खरेदीत ४१ हजार २०५ कोटींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राफेल विमान खरेदीत ४१ हजार २०५ कोटींवर दरोडा सत्ताधारी भाजपने घातला. काँग्रेसने यावर वारंवार संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) ची मागणी केली. मात्र, मोदी सरकार ते फेटाळत आहे. आता या घोटाळ्याचा निकाल देशातील जनताच लावेल, असे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले.
देशाला १२६ विमानांची गरज असताना किंमत वाढून केवळ ३६ विमानेच खरेदी करण्यात येत आहेत. रक्षा मंत्रालयातील हेड आॅफ फायनान्स सुधांशु मोहंती यांनी विमानांची किंमत वाढविण्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. याच प्रकरणात भाजपाचे माजी मंत्री यशवंत सिन्हा आणि प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने योग्य फोरमकडून चौकशी करण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे, तर मोदी सरकारने न्यायालयाला खोटी माहिती पुरविली. जेपीसीकडून कॅगच्या अहवालाची पडताळणी झाल्याचे सांगितले, तर चेअरमन खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी असा अहवाल कमिटीकडे आला नसल्याचे स्पष्ट केल्याची माहिती आमदार राहूल बोंद्रे यांनी दिली. यावेळी आ. यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, प्रवक्ता सुधीर ढोणे, केवराम काळे, माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, प्रल्हाद ठाकरे, जयंत देशमुख, बळवंत वानखडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलन
याच प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसवासी धडकले. आंदोलनात आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, आ. राहुल बोंद्रे, सुधीर ढोणे, सुधाकर भारसाकळे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, मोहन सिंगवी, बाळासाहेब हिंगणीकर, मोहन पाटील, गणेश आरेकर, नितीन दगडकर, सुरेश निमकर, हरिभाऊ मोहोड, प्रदीप देशमुख, प्रमोद दाळू, श्रीराम नेहेर, दयाराम काळे, महेंद्रसिंह गैलवार, विनोद गुळदे, संजय वानखडे, प्रकाश काळबांडे, भागवंत खांडे, बंडू देशमुख, प्रदीप वाघ, गजानन राठोड, हरेराम मालवीय, पंकज मोरे, प्रभाकर वाघ, अभिजित बोके, दीपक सवाई, वासंती मंगरोळे, बबलू बोबडे, बच्चू बोबडे आदी उपस्थित होते.

Web Title: In the public debate, the results of the Rafael scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.