इर्र्विन चौकात आज जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:00 AM2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:01:04+5:30

आक्रमण संघटनेच्यावतीने शुक्रवारी सकाळी ९ वाजता महापरित्राण पाठ भंते प्रज्ञाबोधी व त्यांचा महासंघ करणार आहे. सकाळी १०.३० वाजता बिगूलवर मानवंदना, राष्ट्रगीत होणार आहे. दुपारी १२ वाजता अतिथींकडून महामानवाला शब्दसुमनांजली अर्पण करण्यात येणार आहे.

The public ocean today at Irvine Square | इर्र्विन चौकात आज जनसागर

इर्र्विन चौकात आज जनसागर

Next
ठळक मुद्देमहापरिनिर्वाण दिन : अनुयायी होणार नतमस्तक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्थांकडून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने इर्र्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
आक्रमण संघटना, भीम आर्मी, भीम ब्रिगेड यांसह विविध सामाजिक संघटनांच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुतळा परिसराला गुरुवारी सायंकाळी रोषणाई करण्यात आली. आक्रमण संघटनेच्यावतीने शुक्रवारी सकाळी ९ वाजता महापरित्राण पाठ भंते प्रज्ञाबोधी व त्यांचा महासंघ करणार आहे. सकाळी १०.३० वाजता बिगूलवर मानवंदना, राष्ट्रगीत होणार आहे. दुपारी १२ वाजता अतिथींकडून महामानवाला शब्दसुमनांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, मिनी महापौर सोनाली नाईक या उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता रवि गवई आणि संचातर्फे सुगम संगीताचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ६ वाजता पवन भरडे आणि त्यांचा संच भीम स्वराजंली अर्पण करतील. बडनेरा येथे दी बुद्धिस्ट स्टडीजच्यावतीने आदरांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी ‘एक पेन-एक वही’ हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला इर्विन चौकात तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, संत कबीर आदी समाजप्रबोधनकारांच्या विचारांचे ग्रंथविक्री स्टॉल लागले आहेत. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांचे होर्डिंग झळकत आहेत.

Web Title: The public ocean today at Irvine Square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.