भाजप समर्थकच करणार विरोधात प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:34 PM2017-12-02T23:34:00+5:302017-12-02T23:34:28+5:30

मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या समर्थकांना चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत डावलण्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या बैठकीत न बोलविल्याने राजकुमार पटेल समर्थक प्रचंड संतापले.

Publicity against BJP supporters | भाजप समर्थकच करणार विरोधात प्रचार

भाजप समर्थकच करणार विरोधात प्रचार

Next
ठळक मुद्देखळबळ : दानवेंच्या बैठकीत मेळघाटच्या राजकुमार पटेलांना डावलले

आॅनलाईन लोकमत
चिखलदरा : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या समर्थकांना चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत डावलण्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या बैठकीत न बोलविल्याने राजकुमार पटेल समर्थक प्रचंड संतापले. पालिकेविरुद्ध काम करण्याचा निर्धार त्यांनी केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. जि.प. निवडणुकीत मेळघाटात भाजपला पराभव पत्करावा लागल्याने राजकुमार पटेलांना भाजपमध्ये येण्यासाठी मनधरणी करण्यात आली होती. त्यानंतर धारणी पंचायत समिती निवडणूक लागल्याने पटेल यांच्या नेतृत्त्वात दहाही जागांवर भाजपने यश मिळविले, हे विशेष.
पालिकेत समर्थकांचे तिकीट कापले
१३ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत राजकुमार पटेल यांच्या समर्थकांचे नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी भाजपने उमेदवारी नाकारल्याने राजकुमार पटेलसह समर्थक प्रचंड संतापले असून त्यांनी शुक्रवारी भाजपविरोधी काम करण्याचे जाहीर केल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. परिणामी पालिकेत आमने-सामने असलेल्या भाजप-काँग्रेसच्या तुल्यबळ लढतीमध्ये राजकुमार समर्थक विरोधात काम करणार असल्याने त्याचा फायदा काँगे्रस व अपक्ष उमेदवारांना होणार असल्याचे स्पष्ट झाले.
दानवेंच्या बैठकीचे निमंत्रण नाही
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी अमरावती येथे पक्षातील प्रमुख पदाधिकाºयांची बैठक घेतली. मात्र, बैठकीचे निमंत्रण राजकुमार पटेल यांना मिळालेच नाही. परिणामी पटेल दिवसभर धारणीत कार्यकर्त्यांच्या कामात व्यस्त होते. त्यांना हेतुपुरस्सर डावलल्याचा आरोप समर्थकांनी केला असून येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारीसुद्धा त्यांना मिळू नये, यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे

भाजप प्रदेशाध्यक्ष बैठकीचे निमंत्रण मिळाले नाही. चिखलदरा पालिका निवडणुकीत समर्थकांना डावलले. याचा अर्थ धारणी पंचायत समितीसाठीच आपला उपयोग घेतला. विधानसभेसाठी आपली आवश्यकता नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे विरोधात प्रचार करू.
- राजकुमार पटेल, माजी आमदार, मेळघाट

Web Title: Publicity against BJP supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.