पुणे- हावडा आजपासून धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:12 AM2021-02-15T04:12:59+5:302021-02-15T04:12:59+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गर्दी बघता पुणे-हावडा ही नवी गाडी सुरू करण्याचा निर्णय ...
अमरावती : कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गर्दी बघता पुणे-हावडा ही नवी गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथून ही रेल्वे रविवारी सुटणार असून, बडनेरा रेल्वेस्थानकात सोमवारी पोहोचणार आहे. त्यामुळे आता बडनेरा स्थानकावर ये-जा करणाऱ्या ६५ रेल्वे गाड्या झाल्या आहेत. मुंबई, पुणे मार्गावर धावणाऱ्या गाड्या मार्चपर्यत हाऊसफुल्ल आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च २०२० पासून रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मध्यंतरी परप्रांतीय कामगार, मजूर यांना स्वगृही परत जाण्याचा प्रश्न उपस्थित झाला असताना विशेष बाब म्हणून मजूर स्पेशल रेल्वे गाड्या देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू करण्यात आल्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने विशेष आणि फेस्टिव्हल गाड्यांनाच परवानगी दिली.
आता हळूहळू यात काही रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पुणे-हावडा या नवीन गाडीने यात भर घातली आहे. मात्र, विशेष गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवेश नसल्याने सामान्य प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. मात्र, बडनेरा स्थानकाहून तब्बल ६५ रेल्वे गाड्या धावत असल्याबाबत प्रवासी आनंद पहावयास मिळत आहे.
---------------------
बडनेरा स्थानकाहून धावणाऱ्या रेल्वे गाड्या
बडनेरा स्थानकाहून पुणे-हावडा, मुंबई -नागपूर, पुणे-नागपूर, कुर्ला -हटिया, कुर्ला- विशाखापट्टणम, तिरुपती -अमरावती. मडगाव- नागपूर, गांधीधाम-विशाखापट्टणम, जोधपूर-चेन्नई, अहमदाबाद- नागपूर, पुणे-नागपूर, मुंबई -नागपूर, सुरत-मालदाटाऊन, पुणे-अमरावती, पुणे-अजनी, मुंबई-गोंदिया, अहमदाबाद- पुरी, गांधीधाम -पुरी, पुणे-नागपूर हमसफर, पुणे-अजनी, अहमदाबाद -चेन्नई, कोल्हापूर- गोंदिया, अहमदाबाद- हावडा, मुंबई-हावडा, जयपूर -सिंकदरबाद, हिसार-सिंकदराबाद, कुर्ला-हावडा, ओखा-हावडा, पोरबंदर-हावडा अशा अप-डाऊनचा ६४ रेल्वे गाड्या धावत आहेत.
-------