पुण्याच्या विलास डोईफोडेने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 10:43 PM2018-01-14T22:43:31+5:302018-01-14T22:44:52+5:30
डाव प्रतिदावाच्या चुरशीत पुण्याचा मल्ल विलास डोईफोडे याने हरियाणाच्या मल्लाला पराभूत करून बडनेऱ्यातील युवा स्वाभिमान पक्ष व तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या .....
आॅनलाईन लोकमत
बडनेरा : डाव प्रतिदावाच्या चुरशीत पुण्याचा मल्ल विलास डोईफोडे याने हरियाणाच्या मल्लाला पराभूत करून बडनेऱ्यातील युवा स्वाभिमान पक्ष व तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विजय मिळविला. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके विशेष करून उपस्थित होते.
जुन्यावस्तीतील सावता मैदानावर १२ व १३ जानेवारी रोजी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. महाराष्ट्रासह इतरही राज्यातील मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले होते. मुख्य लढतीच्या दिवशी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याने संपूर्ण मैदानाला फेरफटका मारून प्रेक्षकांना अभिवादन केले. कुस्ती स्पर्धेचे आयोजक आ. रवी राणा, नवनीत राणा, संजय तिरथकर यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके याचा चांदीची गदा व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. मुख्य लढत पुण्याचा विलास डोईफोडे व हरियाणाचा सोनुकुमार यांच्यात झाली. या दोघांमध्ये अर्धा तास कुस्ती चालली. यात पुण्याचा विलास डोईफोडे हा विजय ठरला. तुल्यबळ लढतीत एका डावात सोनुकुमार याला पुण्याच्या मल्लाने चित्त केल्याचा आग्रह धरल्याने काही वेळ ही कुस्ती थांबून होती. नंतर चित्रफीत तपासून पुन्हा पाच मिनिटांचा अवधी देत ज्याने पहिला पॉर्इंट जिंकला त्याला पंचकमेटीने विजयी ठरविले. यात विलास डोईफोडेला विजयी घोषित करण्यात आले. त्याला रोख रक्कम व गदा देण्यात आली. मुख्य लढतीच्या कार्यक्रमाला शिक्षक आ. श्रीकांत देशपांडे, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, क्रीडा अधिकारी, गणेश जाधव, अविनाश पुंड, पोलीस उपायुक्त शशिकुमार सातव, चिन्मय पंडित, शंकरराव हिंगासपुरे आदी उपस्थित होते. स्पर्धेत पंच म्हणून सुबोध भागडकर व मनोज तायडे यांनी काम पाहिले. संचालन नाना आमले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीळकंठ कात्रे, सचिन भेंडे, विनोद जायलवाल, अजय बोबडे, अजय जयस्वाल, संजय हिंगासपुरे, राजू रोडगे, विनोद गुहे, अमोल मिलखे, विलास वाडेकर, रामू कातोरे, निल निखार, अनुप अग्रवाल, नीलेश भेंडे, जयंतराव वानखडे, सुधीर लवणकर, अजय मोरय्या, ज्योती सैरिसे, चंदा लांडे, यासह इतरही कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.