कवडीमोल भावाने शासकीय कापूस खरेदी

By Admin | Published: November 18, 2015 12:18 AM2015-11-18T00:18:38+5:302015-11-18T00:18:38+5:30

येथील गोमती जिनिंग-प्रेसिंगमध्ये महाराष्ट्र राज्य पणन् महासंघाच्यावतीने मंगळवारपासून शासकीय कापूस खरेदीला सुरूवात करण्यात आली.

Purchase of government cotton in a weaker house | कवडीमोल भावाने शासकीय कापूस खरेदी

कवडीमोल भावाने शासकीय कापूस खरेदी

googlenewsNext

वरुड : येथील गोमती जिनिंग-प्रेसिंगमध्ये महाराष्ट्र राज्य पणन् महासंघाच्यावतीने मंगळवारपासून शासकीय कापूस खरेदीला सुरूवात करण्यात आली. खासगी व्यापारी आणि शासनाचे दर जवळपास सारखेच असून ४ हजार १०० रूपये प्रति क्विंटलने खरेदी सुरु झाली आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून कापसाची रोख रक्कम मिळते, तर पणन महासंघाकडून ती तिसऱ्या दिवशी खात्यावर वळती केली जाते. कापूस लागवडीचा खर्चसुध्दा ४ हजार १०० रूपये प्र्रतिक्विंटलच्या भावात निघत नसल्याने कापूस उत्पादकांवर आता सुलतानी संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचा कापूस घरात आला असला तरी दिवाळी मात्र अंधारात गेली आहे.

Web Title: Purchase of government cotton in a weaker house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.