तूर खरेदी : पाच जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:19 PM2018-06-19T22:19:38+5:302018-06-19T22:19:48+5:30
तूर खरेदी केंद्रावर टोकण क्रमाकांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. व्यवस्थापक राजेंद्र गायकी, गौरव गोपाळ खाडे, नंदू राजेरामजी वाढोणकर, धीरज सुरेश गावंडे व अंकुश अशोक कदम अशी आरोपींची नावे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तूर खरेदी केंद्रावर टोकण क्रमाकांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. व्यवस्थापक राजेंद्र गायकी, गौरव गोपाळ खाडे, नंदू राजेरामजी वाढोणकर, धीरज सुरेश गावंडे व अंकुश अशोक कदम अशी आरोपींची नावे आहेत.
शासकीय हमीभाव तूर खरेदी केंद्रावर गैरप्रकार करणाºया अमरावती सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीचे कर्मचारी व व्यवस्थापकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी तक्रार जिल्हा उपनिबंधक राजेंद्र पालेकर यांनी मंगळवारी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. नाफेडमार्फत राज्यात हमी भावाने तूर खरेदी करण्यात येते. अमरावती व भातकुली तालुक्यातील शेतकºयांसाठी कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राची जबाबदारी खरेदी-विक्री संघ सांभाळते. त्यासाठी संस्था सबएंजट म्हणून काम करते. त्यांनी १ फेब्रुवारी २०१८ पासून शेतकºयांची तूर खरेदी केली. जिल्हा उपनिबंधकांच्या सूचनेप्रमाणे ही खरेदी करण्याचे बंधनकारक होते. मात्र, तूर खरेदी केंद्रावर टोकण क्रमाकांमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या. याबाबत जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी ४ मे रोजी चौकशी करून तो अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर केला. दरम्यान, कृष्णराव औगड, भोंडे व संजय लव्हाळे यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत झालेला चौकशी अहवाल सादर करण्यात आला. या चौकशीत खरेदी-विक्री संघाने तूर खरेदीसाठी शेतकºयांची नावनोंदणी प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली नसल्याचे निदर्शनास आले. एकापेक्षा अधिक नोंदवह्या उपयोगात आणल्या. मध्येच काही क्रमांक सोडून पुढचे देण्यात आले. एकच क्रमांक दोन वा अधिक शेतकºयांना देण्यात आला. खरेदी विक्री संघ व्यवस्थापकांनीही चुका झाल्याचे लेखी मान्य केले. कृष्णराव औगड व संजय लव्हाळे यांनी जानेवारीत नोंदणी केली असतानाही त्यांची तूर खरेदी झाली नाही. चौकशीनुसार टोकण क्रमाकांत अनियमितता व गैरप्रकार झाल्याचा अभिप्राय नोंदवून अमरावती सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीला जबाबदार धरून संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाईचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे तूर खरेदीत गैरप्रकार व अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी जिल्हा उपनिबंधकांना दोषीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे निर्देशित केले.
शासकीय तूर खरेदी केंद्रावरील टोकण क्रमांकात अनियमितता व गैरप्रकार झाल्याची तक्रार चौकशी अहवालासह प्राप्त झाली. त्या अनुषंगाने आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर.