अटी-शर्तींची सक्ती, नाफेड केंद्रे ओस, व्यापा-यांची पाच लाख केंद्रांवर सात हजार क्विंटलची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 09:34 PM2017-11-07T21:34:01+5:302017-11-07T21:34:18+5:30
अमरावती : जिल्ह्यातील दहा केंद्रांवर नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू आहे. मागील आठ दिवसांत या केंद्रांवर ३६८ शेतक-यांचे ८ हजार २९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.
वीरेंद्रकुमार जोगी
अमरावती : जिल्ह्यातील दहा केंद्रांवर नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू आहे. मागील आठ दिवसांत या केंद्रांवर ३६८ शेतक-यांचे ८ हजार २९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. यातुलनेत व्यापा-यांद्वारा यंदाच्या हंगामात हमीपेक्षा कमी भावाने ४ लाख ४५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. शाककीय खरेदी केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्तींचा भडीमारासोबतच एफएक्यू निकषाचा फटका शेतक-यांना नाहक बसत आहे. यामुळे नाफेड, पणन व सीसीआयची खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.
यंदाचा हंगाम सुरू झाला असतानाही नाफेडची केंदे सुरू झाली नसल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिळेल त्या भावात सोयाबीन बाजार समित्यांमध्ये विकावे लागले. व्यापाºयांनीही आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने सोयाबीनची खरेदी केली. यामध्ये शेतकºयांना कोट्यवधींचा फटका बसला. नाफेडच्या खरेदी केंद्रावर संबंधित शेतकºयांवर सात-बारा, बँक खात्याची झेरॉक्स, अधारकार्ड यासह सोयाबिनची आर्द्रता आदी अटी लादण्यात आल्या आहेत.
यंदाच्या हंगामात सोयाबीन सवंगणीच्या काळात अवकाळी पाऊस असल्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, सोयाबीनची प्रतवारी खराब झाल्यामुळे डागी सोयाबीन खरेदी केंद्रांवर नाकारल्याने शेतकºयांना खुल्या बाजारात विकावा लागला. व्यापाºयांवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांची मनमानी सुरू आहे. यामध्ये सरळ शेतकºयांना फटका बसत आहे.
मूग, उडीद, ज्वारीच्या खरेदीवर परिणाम
शासकीय धान्य खरेदी सुरू झाल्यानंतर बाजार समित्यांमध्ये मुग, उडीद व ज्वारीची आवक होत आहे. शेतकरी शासनाला धान्य न विकता थेट व्यापाºयांशी सौदे करीत असल्याचे चित्र आहे. बाजार समित्यांमध्ये ५१ शेतकºयांनी ५५३ क्विंटल मुग, ६७ शेतकºयांनी ५०७ क्विंटल उडीद विक्री झाला. शेतकºयांनी मोठ्या संख्येत व्यापाºयांकडे मुग व उडीदाची विक्री केली आहे. यंदा कमी पावसामुळे मुग व उडिदाचे उत्पादन प्रभावित झाले आहे. ज्वारी उत्पादक शेतकरी आपला माल थेट व्यापाºयांकडे घेउन जात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. शेतकºयांना आॅनलाइन नोंदणीत अडचण नाही. मात्र, यंदाचे बहुतांश सोयाबीन एफएक्यू दर्जाचा असल्यामुळे खरेदी मंदावली आहे.
- रमेश पाटील,
जिल्हा विपणन अधिकारी
नाफेड केंद्रावरील नोंदणी, खरेदी व व्यापारी खरेदी क्विंटल
बाजार समिती केंद्र नोंदणी नाफे ड खरेदी व्यापारी खरेदी
अचलपूर १६० १५७ १३९०९
अमरावती : २१३ १५ २९८६९६
अंजनगाव सुर्जी ६८ १९८ १३२५३
चांदूर बाजार ६७ ११३ १७१९७
चांदूर रेल्वे ५२३ ३०१ १२८५१
दर्यापूर २२ ३२ १०५८१
धामणगाव रेल्वे ५१२ ४७२७ ७०२७३
मोर्शी १२३ ४०८ १९८४३
नांदगाव खंडेश्वर ३०२ ४०२ १४२३७
तिवसा ११२ ६६७ -
धारणी ४९ 000 ५७५०
वरूड ३८ 000 ५२१
एकूण २१९२ ८२९३ ४७७७८५