रुग्णवाहिकेला ‘दे धक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:52 AM2019-09-10T01:52:43+5:302019-09-10T01:54:01+5:30

भातकुली तालुक्यातील आष्टीसह टाकरखेडा, साऊर, रामा, खारतळेगाव या मोठ्या गावांसह ३७ गावे येतात. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना गावांमधून आणावे लागते तसेच काही रुग्णांना अमरावती येथेदेखील पाठविले जाते. याकरिता एक रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला देण्यात आली. रुग्णवाहिकेला आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तथापि, तीन ते चार वर्षांपासून रुग्णवाहिका नादुरुस्त आहे.

'Push' to the ambulance | रुग्णवाहिकेला ‘दे धक्का’

रुग्णवाहिकेला ‘दे धक्का’

Next
ठळक मुद्देरुग्णांच्या जिवाशी खेळ : आष्टीत आरोग्यसेवेचा खेळखंडोबा

लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू : नजीकच्या आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सेवेत असलेली रुग्णवाहिका ही ‘धक्कागाडी’ झाली आहे. ती केव्हाही बंद पडते आणि त्यानंतर चार-पाच जणांनी ढकलल्याशिवाय सुरूच होत नाही. यामुळे आरोग्यसेवेचा खेळखंडोबा झाला आहे.
भातकुली तालुक्यातील आष्टीसह टाकरखेडा, साऊर, रामा, खारतळेगाव या मोठ्या गावांसह ३७ गावे येतात. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना गावांमधून आणावे लागते तसेच काही रुग्णांना अमरावती येथेदेखील पाठविले जाते. याकरिता एक रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला देण्यात आली. रुग्णवाहिकेला आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तथापि, तीन ते चार वर्षांपासून रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. तिने रुग्णांना अनेकदा दगा दिला. बहुतेक वेळा रुग्ण असतानाच ही रुग्णवाहिका बंद पडल्याने वाहनचालकाला खाजगी वाहनाने रुग्णांना न्यावे लागले. कित्येकदा रुग्णवाहिका धक्का देऊन सुरू करावी लागते. आरोग्य विभागात रुग्णवाहिका दुरुस्त आणि पूर्णत: सज्ज असणे आवश्यक आहे.
आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आजवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर रुग्णवाहिका बदलून देण्याबाबत आरोग्य विभागाकडे वारंवार गाºहाणे मांडले आहे. परंतु, त्यांची दखल घेतली गेली नाही. आरोग्य विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
दोन दिवसांपूर्वी धारणी तालुक्यात एक रूग्णवाहिका बंद पडून एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. पूर्णा नगरलाही तोच प्रकार घडला त्यामुळे आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राला एखाद्या रूग्णाच्या मृत्यूची प्रतिक्षा आहे का ? असा संतापजनक सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडली असतांना रूग्णवाहिकेसारखी आपातकालीन सेवा नादुरूस्त होत असल्याने रूग्णांची मोठ्या प्रमाणात आबाळ होत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची अपेक्षा आहे.

Web Title: 'Push' to the ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य