वाळू तस्करीतील ‘पुष्पा’; १५० जणांविरुद्ध कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 05:00 AM2022-03-07T05:00:00+5:302022-03-07T05:01:03+5:30

चंदन तस्करीतून मजूर ते माफिया असा प्रवास करणाऱ्या ‘पुष्पा’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अमरावतीतही काहींनी वाळूतस्करीतून बिल्डर ते लोकप्रतिनिधी अशी मजल मारली आहे. त्यांची ही प्रगती पाहून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांनी वाळू तस्करी सुरू केली असून, सध्या त्यांच्यावरही ‘पुष्पा’चे गारुड आहे. रात्रभर अवैधरित्या उपसा करून त्यांनी ‘प्रशासनासमोर झुकेगा नही साला’ अशीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

‘Pushpa’ in sand smuggling; Action against 150 people! | वाळू तस्करीतील ‘पुष्पा’; १५० जणांविरुद्ध कारवाई!

वाळू तस्करीतील ‘पुष्पा’; १५० जणांविरुद्ध कारवाई!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :  वाळू तस्करीतील अनेक ‘पुष्पा’ पोलिसांच्या रडारवर आले आहेत. जवळपास दीडशे जणांवर कारवाई करण्यात आली असली तरी त्यांचे ‘बॉस’ मोकाट आहेत. जिल्हाभरात वाळू तस्कर सैराट झाले आहेत.
चंदन तस्करीतून मजूर ते माफिया असा प्रवास करणाऱ्या ‘पुष्पा’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अमरावतीतही काहींनी वाळूतस्करीतून बिल्डर ते लोकप्रतिनिधी अशी मजल मारली आहे. त्यांची ही प्रगती पाहून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांनी वाळू तस्करी सुरू केली असून, सध्या त्यांच्यावरही ‘पुष्पा’चे गारुड आहे. रात्रभर अवैधरित्या उपसा करून त्यांनी ‘प्रशासनासमोर झुकेगा नही साला’ अशीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गतवर्षी रेतीचोरीचे गुन्हे उघड झाले.
जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू घाट आहे. यंदा अनेक वर्षांनंतर काही घाटांचा लिलाव झाला आहे. विशेषत: लिलावानंतरही लिलाव झालेल्या आणि न झालेल्या घाटातून अवैधरित्या वाळू उपसा होतो. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींचा हस्तक्षेपही वाढला आहे. यासोबतच राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई करताना अधिकाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून कारवाईला न घाबरता महसूल आणि पोलीस प्रशासनासमोर ‘झुकेगा नही साला’ अशाच अविर्भावात सध्या वाळू तस्कर वावरताना दिसत आहे.

तस्करांनी वाढविले वाळूचे भाव
जिल्हा खनिकर्म विभागाकडून दरवर्षी वाळू घाटांचा लिलाव केला जातो. परंतु घाटधारक लिलावाकडे पाठ फिरवितात. किंवा एक घाट लिलावात घेऊन लगतच्या दुसऱ्या घाटामध्ये उत्खनन करतात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याने याच स्पर्धेतून सर्वसामान्यांना मात्र चढ्या दराने वाळू विकत घ्यावी लागते. ही हडेलहप्पी रोखण्याची ताकद प्रशासनामध्ये असली तरी ती ताकद वापरलीच जात नाही, असे चित्र आहे. 

वाळू तस्करांचे अधिकाऱ्यांवर हल्ले 
वाळू तस्करांचा रात्रीच्या अंधारातच खेळ चालत असल्याने अधिकाऱ्यांनाही कारवाईकरिता अडचणी निर्माण होतात. अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन चालविणे, धमकाविणे आदी प्रकार इतरत्र घडताना दिसतात.  वाळू चोरून नेणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या नायब तहसीलदार यांच्या अंगावर थेट वाळूमाफियांनी ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न केला.  भातकुली तालुक्यातील पेढी नदीत हा धक्कादायक प्रकार  घडला होता. याशिवाय तलाठ्यांवर देखील हल्ले झाले आहेत. याशिवाय धामणगाव रेल्वे, तिवसा व चांदूर रेल्वे तालुक्यातही हल्ल्याचे गुन्हे दाखल आहेत.

उत्खननाची १०० वर प्रकरणे
जिल्ह्यातील चौदाही तालुक्यामध्ये वर्षभरात वाळू, मुरुम, दगड या गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक संदर्भात प्रकरणे दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक  प्रकरणे फक्त वाळू संदर्भातील आहे. पोलीस प्रशासनाकडून सरकारी कामकाजात अडथळा, वाळूचोरी व हल्लाबाबत ६० गुन्हे दाखल केले असून १५० आरोपींविरुद्ध हल्ला, सरकारी कामकाजात अडथळा व चोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  केली. पोलीस व महसूल यंत्रणेकडून वाळू तस्करांवर नियमितपणे कारवाई केली जाते. 

 

Web Title: ‘Pushpa’ in sand smuggling; Action against 150 people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू