शेतणखताचा ढिगारा इथून उचलला तेथे टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 09:53 PM2017-09-07T21:53:17+5:302017-09-07T21:53:29+5:30

प्रशांतनगर नाल्यात अतिक्रमण करून अवैधरीत्या साठविलेला शेणखताचा अवाढव्य ढिगारा हटविण्याचा निव्वळ फार्स करण्यात आला. ज्या ठिकाणी शेणखताचा ढिगारा होता तेथून हटवून ते शेणखत नाल्याच्या अन्य भागात टाकण्यात आले.

Put the debris of farming picked up here | शेतणखताचा ढिगारा इथून उचलला तेथे टाकला

शेतणखताचा ढिगारा इथून उचलला तेथे टाकला

Next
ठळक मुद्देअनास्था : प्रशांतनगरमधील पशूव्यावसायिकाचे बांधकामही अनधिकृत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रशांतनगर नाल्यात अतिक्रमण करून अवैधरीत्या साठविलेला शेणखताचा अवाढव्य ढिगारा हटविण्याचा निव्वळ फार्स करण्यात आला. ज्या ठिकाणी शेणखताचा ढिगारा होता तेथून हटवून ते शेणखत नाल्याच्या अन्य भागात टाकण्यात आले. यात महापालिकेची दिशाभूल करण्यात आली. ‘प्रशांतनगर नाल्यात खताचा ढिगारा’ या ‘लोकमत’च्या वृत्ताने खडबडून उठलेल्या महापालिका प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर संबंधिताने नाल्यात साठविलेला खताचा ढिगारा हटविण्यासाठी जेसीबीचा वापर केला. तो ढिगारा काही प्रमाणात हटव्विण्यात आला. मात्र, तेथिल अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण हटविण्यास महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही.
दुकानांसह गोठ्याचे ते बांधकाम अतिक्रमित असल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असताना अतिक्रमण निर्मुलन विभागाने त्याकडे केलेले दुर्लक्ष अर्थकारणाच्या शंकेला खतपाणी घालणारे ठरले आहे. अतिक्रमित बांधकाम पाडण्यात येईल, अशी माहिती अतिक्रमण निर्मुलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी ४ सप्टेंबरला ‘लोकमत’शी बोलताना दिली होती. महापालिकेचे पोलीस पथक गणेश विसर्जनासाठी आयुक्तालयाने माघारी बोलविल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले नाही.
नोटीसनंतर ढिगारा उचलण्याची खानापूर्ती
‘लोकमत’च्या वृत्तानंतर संबंधित स्वास्थ्य निरीक्षकाने नाल्यात शेणखताचा ढिगारा लावणाºया विनोद खंडारे यांना ढिगारा उचलण्यासंदर्भात ३ दिवसांची नोटीस बजावली होती.त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जेसीबी आणून तो काही प्रमाणात का होईना, हटविण्यात आला. ते शेणखत त्याच नाल्यात थोडे पुढे टाकल्याच तक्रार नव्याने नोंदविण्यात आली आहे. संबंधिताकडे १८ पेक्षा अधिक म्हशींचे शेणखत साठविण्यासाठी जागाच उपल्ब्ध नसल्याने खंडारे यांनी राजरोसपणे महापालिकेला आव्हान देत नाल्यात अतिक्रमण केले होते, हे विशेष.
प्रशांतनगरात डेंग्यूचा फैलाव
अमरावती : प्रशांतनगर परिसरातील चार ते पाच नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती असून या डेंग्यूबाधित रूग्णांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात डेंग्यूमुळे नुकताच एका तरूणाचा बळी गेला आहे. पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी साचून राहते. बहुतांश घरांवर पडून असलेल्या टाकाऊ वस्तू किंवा साहित्यात पाणी साचते. डेंग्युचे एडीज एजीप्त हे डास घराच्या आवारातच असल्यामुळे डेंग्युची लागण होण्याचे शक्यता अधिक असते.

डेंग्युचा प्रसार शहरात वाढत आहे. चार रुग्ण प्रशांतनगरातील असून याभागात वेगाने फैलाव होत असल्याचे दिसत आहे. रूग्णांवर योग्य उपचार सुरु आहेत. खासगी रुग्णालयातही काही रुग्ण दाखल आहेत.
- रोहन काळमेघ,
ह्यदयरोग व मधुमेहतज्ज्ञ
 

Web Title: Put the debris of farming picked up here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.