निर्यातवृध्दीसाठी कृषी उत्पादनांची गुणवत्तावाढ आवश्यक - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 04:36 PM2022-07-18T16:36:47+5:302022-07-18T16:40:33+5:30

ते अमरावतीत अपेडा आणि अॅग्रोव्हिजन फाऊंडेशनने आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.

Quality improvement of agricultural products is necessary for export growth - Nitin Gadkari | निर्यातवृध्दीसाठी कृषी उत्पादनांची गुणवत्तावाढ आवश्यक - नितीन गडकरी

निर्यातवृध्दीसाठी कृषी उत्पादनांची गुणवत्तावाढ आवश्यक - नितीन गडकरी

Next

अमरावती : विदर्भातून फळ, फुले, भाज्या आदी कृषी उत्पादनांची निर्यात वाढण्यास मोठा वाव आहे. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, प्रयोगशीलता आवश्यक आहे. कृषी उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे, सुरक्षिततेबाबतचे सर्व निकष पूर्ण करणे, उत्तम पॅकेजिंग गरजेचे आहे. विदर्भातून निर्यात वाढविण्यासाठी ‘अपेडा’ व ‘ॲग्रोव्हीजन’च्या माध्यमातून सर्वंकष प्रयत्न होतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे सांगितले.

कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) व ॲग्रोव्हीजन फाउंडेशनतर्फे ‘विदर्भातील कृषी उत्पादन आणि भाजीपाला निर्यातीची संधी’ या विषयावरील कार्यक्रम येथील एका हॉटेलमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे, ‘अपेडा’चे संचालक तरुण बजाज, सदस्य आनंद राऊत, विभा भाटिया, दिलीप घोष, फाउंडेशनचे अध्यक्ष रवि बोरटकर, मनीष मोंढे, श्रीधर ठाकरे, दिनेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कृषी निर्यातवृद्धीसाठी संयुक्त कार्यक्रम राबविण्याबाबत ‘अपेडा’ व ॲग्रोव्हीजन फाउंडेशनमध्ये यांच्यात झालेला करार यावेळी बजाज व बोरटकर यांनी स्वाक्षांकित केला.

गडकरी म्हणाले की, विदर्भातील कृषी निर्यात वाढविण्यासाठी प्रयोगशीलता, नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. निर्यातीसाठी उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे आवश्यक आहे. चांगल्या रोपवाटिका ठिकठिकाणी निर्माण झाल्या पाहिजेत. खत, औषध फवारणीसाठी ड्रोनने स्प्रेइंग करण्यासारख्या नव्या व उपयुक्त बाबी सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. उत्पादनाची सुरक्षितता हा जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचा मापदंड मानला जातो. कृषी उत्पादनात कीडनाशकाचे अंश आढळले तर माल नाकारला जातो. हे टाळण्यासाठी सेंद्रिय प्रक्रिया करतानाच उत्पादनात वाढ व गुणवत्ताही टिकून राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विविध स्तरात प्रयोग होत आहेत.

Web Title: Quality improvement of agricultural products is necessary for export growth - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.