१२६ शाळांमध्ये गुणवत्ता चाचणी
By admin | Published: January 7, 2015 10:46 PM2015-01-07T22:46:14+5:302015-01-07T22:46:14+5:30
तालुक्यातील १२६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी तपासण्याकरिता, लेखन, वाचन व गणित विकास अभियान ५ व ६ जानेवारीला राबविण्यात आले. यात जिल्हा परिषदेच्या
चांदूरबाजार : तालुक्यातील १२६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी तपासण्याकरिता, लेखन, वाचन व गणित विकास अभियान ५ व ६ जानेवारीला राबविण्यात आले. यात जिल्हा परिषदेच्या १२१ व नगरपालिकेच्या ५ शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यात आली. येत्या दोन दिवसांत या संबंधीचा संपूर्ण अहवाल गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर होणार आहे. या अहवालानंतरच प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचे सत्य समोर येणार आहे.
शासन प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करतो. तरीही जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळांचा दर्जा अतिशय सुमार आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांची प्राथमिकपणे गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, याची मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल घेवून शासनाने वाचन, लेखन व गणित विकास कार्यक्रम आखला होता. त्यानुसार ५ जानेवारी व ६ जानेवारीला शाळांमधून हे अभियान राबविण्यात आले आहे.
वर्ग २ ते ५ च्या विद्यार्थ्यांकरिता हे गुणवत्ता तपासणी अभियान राबविण्यात आला. त्यासाठी किमान अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. या अभ्यासक्रमाची पुस्तिका आधीच सर्व शाळांना पाठविण्यात आली होती. त्या मार्गदर्शक पुस्तिकेनुसार गुणवत्ता तपासणी अभियान राबविल्या आले आहे. या पुस्तिकेत शिक्षकांना कशा पध्दतीने शिकवावे व विद्यार्थ्यांची चाचणी कशी घ्यावी या बाबतीचे सविस्तर विश्लेषन करण्यात आले आहे. याबाबतीचे प्रशिक्षणही शिक्षकांना आधीच देण्यात आले होते.
वेगवेगळ्या वर्गासाठी चाचणीचे स्वरुप ही वेगवेगळे ठेवण्यात आले होते. वर्ग २ च्या विद्यार्थ्यांना सोपी दोन वाक्ये वाचता यावी. सोप्या चार वाक्यांचे वाचन करुन त्यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे लिहीण्यास सांगण्यात आली. ओळखीचे चित्र पाहून त्याचे नाव लिहिण्या लावणे, अंक २० पर्यंतच्या संख्यांचे वाचन, लेखन, तुलना आणि एक अंकी संख्यांची बेरीज-वजाबाकी देण्यात आली होती. वर्ग तीन मधील विद्यार्थ्यांना चार ते पाच ओळींचा परिच्छेद वाचावयास देण्यात आला. त्यावर आधारित प्रश्नही विचारण्यात आलेत. तसेच चार वाक्यांचे लेखन, दोन अंकी संख्याचे वाचन, लेखन व तुलना यावरुन गुणवत्ता तपासणी करण्यात आली.
चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा ते आठ ओळींचा परिच्छेद वाचन, सोप्या वाक्याचा मजकुरावरुन त्यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे लिहीने, चित्राच्या आधारावर दोन ते तीन वाक्य लिहीने, १००० पर्यंतच्या संख्यांचे वाचन व तीन अंकी संख्यांची तुलना व मांडणी यावरुन गुणवत्ता तपासणी करण्यात आली. तसेच वग ५ साठी आठ ओळींचे परिच्छेद वाचन, सोप्या वाक्यांचा मजकुरावर त्यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे लिहने ठरविण्यात आली आहे.
ईरशाद खान, प्रभारी गटशिक्षणाधिकारी पं.स. चांदूरबाजार, शासनाच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात आले असून लवकरच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेवर अहवाल प्राप्त होणार आहे. यात गुण व वक्तेनुसार अ,ब,क, ड अशी चार गटात विभागणी करण्यात येईल. यामध्ये ७५ च्या वरील ब मध्ये ५० ते ७५, क मध्ये ३५ ते ५० व ड मध्ये १५ टक्के च्या खालील विद्यार्थी राहतील. यात क व ड गटातील विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शक पुस्तिकेनुसार त्यांच्या गुणवत्ता स्तर वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्या जाणार आहे.