‘शहानूर’च्या सिंचनावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:23 PM2017-10-28T23:23:24+5:302017-10-28T23:23:37+5:30

अंजनगाव-दर्यापूर या मुख्य शहरांसह दोन्ही तालुक्यांतील अडीचशे गावांना पाणीपुरवठा करणाºया शहानूर धरणाची सिंचनक्षमता यंदा बाधित झाली आहे.

Question mark on the irrigation of 'Shahnur' | ‘शहानूर’च्या सिंचनावर प्रश्नचिन्ह

‘शहानूर’च्या सिंचनावर प्रश्नचिन्ह

Next
ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : उपसा जलसिंचन योजनांचे भविष्य अंधारात

सुदेश मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : अंजनगाव-दर्यापूर या मुख्य शहरांसह दोन्ही तालुक्यांतील अडीचशे गावांना पाणीपुरवठा करणाºया शहानूर धरणाची सिंचनक्षमता यंदा बाधित झाली आहे. आॅगस्टमध्येसुद्धा अर्धेच भरलेल्या या धरणात परतीच्या दमदार पावसामुळे सध्या ६८ टक्के पाणी साठा आहे. या धरणातून यंदा सिंचनाला पाणी द्यावे की नाही? या दुविधेत वरिष्ठ अधिकारी अडकले आहेत.
जिल्ह्यातील इतर धरणांच्या रबी हंगामाचे नियोजन पूर्ण झाले असताना शहानूर धरणाच्या सिंचनासाठी अजूनही जाहिरनामे काढण्यात आलेले नाहीत. यावरून यंदा धरणाच्या सिंचनक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांना याबाबत विचाराणा केली असता हा मुद्दा अजूनही चर्चेसाठी साहेबांच्या टेबलावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
सिंचन अभियंत्यांच्या अहवालानुसार या धरणाची सिंचनक्षमता धरण पूर्ण भरले असताना १० हजार हेक्टर एवढीच आहे. मात्र धरण निर्मितीपासून आजपर्यंत महत्तम एक हजार ५०० हेक्टर ओलीत केले गेले. कालव्याद्वारे प्रवाही पद्धतीने दिलेले पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जाते म्हणून आमदार बुंदिले यांनी पाईपलाइनने पाणी देण्याची योजना सादर केली. मात्र ही योजना उजव्या कालव्यावर सविस्तर वितरिकेद्वारा नियोजित आहे. या योजनेला जलसंपदा मंत्रालयाने रेंगाळत ठेवून डाव्या वितरिकेद्वारा पाईपलाइनने पाणी देणाºया दोन खासगी उपसा जलसिंचन योजनांना नाहरकत पत्र दिले आहे.

शेतकरी झाले पाणीपट्टीसाठी कर्जदार...: एका प्लास्टिक पाईप कंपनीने जानेवारी २०१५ व फेब्रुवारी २०१७ मध्ये पाच-पाच कोटी रूपयांचे कर्ज देऊन अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनीचे गहाणखत केले. शहानूर धरणाची सिंचन क्षमता बाधित झाल्याने सध्या तूर्त या दोन्ही उपसा सिंचन योजना पाण्यापासून वंचित झाल्या आहेत आणि दोन्ही संस्थामधील शेतकरी १० कोटी रूपयांच्या कर्जात व व्याजात अडकले आहेत.
अनेक प्रश्न अनुत्तरित
पाणीपुरवठा व जलसिंचन विभागातील बेजबाबदार अधिकारी शहानूरच्या सिंचन व्यवस्थेचे नियोजन अजूनही करू शकले नाहीत, हे वास्तव आहे. यावर्षीची आपत्ती नैसर्गिक असली तरीही या तालुक्यातील शेतकºयांना उपसा जलसिंचनाचे गाजर दाखवून १० कोटी रुपयांच्या कर्जात अडकविणारे अधिकारी कोण आहेत? शासकीय खर्चाने प्रस्तावित पाणीपुरवठा योजना का रेंगाळत ठेवली? यावर्षी धरणातून शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल का, असे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

शहानूर धरण गतवर्षी पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा ती परिस्थिती नाही. पुढील उन्हाळा किती तीव्रतेचा राहील याचा अंदाज घेऊनच सिंचनाबाबत निर्णय घेण्यात येईल. हा मुद्दा वरिष्ठ अधिकाºयांच्या टेबलवर असल्याने सिंचनाबाबत सध्या काहीही सांगता येणार नाही.
- सचिन हिरेकर,
शाखा अधीक्षक, शहानूर कालवे उपविभाग

Web Title: Question mark on the irrigation of 'Shahnur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.