‘विशाखा’वर प्रश्नचिन्ह !

By admin | Published: May 20, 2017 12:47 AM2017-05-20T00:47:04+5:302017-05-20T00:47:04+5:30

कंत्राटी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांचेविरुद्ध महापालिका कर्मचाऱ्याच्या मानसिक छळ

Question mark on 'Vishakha' | ‘विशाखा’वर प्रश्नचिन्ह !

‘विशाखा’वर प्रश्नचिन्ह !

Next

‘सदार’ प्रकरण : खुलासा मागविल्याने वेगळे वळण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कंत्राटी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांचेविरुद्ध महापालिका कर्मचाऱ्याच्या मानसिक छळ प्रकरणात विशाखा समितीच्या कार्यक्षमता आणि उपयोगितेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. आयुक्तांनी या प्रकरणात विशाखा समितीकडूनच खुलासा मागविल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याने सदार यांच्या विरोधात मानसिक छळाची तक्रार केली होती. यात अंतिम निर्णय घेत सदार यांना समज देण्याची शिफारस विशाखा समितीने केली होती. मात्र या प्रकरणातील पुरावे हेतुपुरस्सरपणे नाहीसे करण्यात आले आहेत, अशी टिप्पणी लिहून आपले कार्य संपले, अशा आविर्भावात विशाखा समितीने हे प्रकरण तब्बल १० महिने दडवून ठेवले.
पुरावे हेतुपुरस्सरपणे नाहीसे करण्यात आले, अशी टिप्पणी करताना किंवा निष्कर्ष नोंदविताना समितीने या पुराव्याबाबत चौकशी करावी किंवा चौकशी करण्याची गरज आहे, असे स्पष्ट केले नाही. सदारांविरोधातील या प्रकरणात विशाखा समिती मुळापर्यंत पोहोचली नाही.
एकीकडे ती तक्रारकर्ती महिला पुरावे देऊ शकली नाही, असे म्हणायचे तर दुसरीकडे या प्रकरणातील पुरावे हेतुपुरस्सरपणे नाहीसे करण्यात आल्याचा निष्कर्ष नोंदवायचा, मात्र हा प्रकार उघड करण्यासाठी किंवा पुरावे नाहीसे केले, कुणी ढवळाढवळ केली, याबाबत आयुक्तांकडे जावून मंथनही करायचे नाही, निष्कर्ष काढून मोकळे व्हायचे, अशी दुटप्पी भूमिका ‘विशाखा’ने घेतली. त्याच आधारे आयुक्तांनी जीएडीला निर्देश देऊन या प्रकरणातील तथ्य उघडकीस आणण्यासाठी विशाखा समितीला विचारणा केली आहे. त्याचबरोबर १० महिने हे प्रकरण फाईलबंद का राहिले, यावरूनही संशयाचे मळभ दाटले आहे.

Web Title: Question mark on 'Vishakha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.