फायर रेस्क्यू वाहन खरेदीतील अनियमिततेची जलद चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 10:24 PM2018-05-26T22:24:05+5:302018-05-26T22:24:05+5:30

महापालिकेने तब्बल २.०४ कोटी रुपये खर्चून घेतलेल्या मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहनातील अनियतमिततेची चौकशी करण्याची आदेश आयुक्त हेमंत पवार यांनी दिले आहेत. २५ मे रोजी आयुक्तांनी हे आदेश काढले असून, चौकशीची जबाबदारी कार्यकारी अभियंता (१) अनंत पोतदार यांच्याकडे देण्यात आली आहे.

Quick probe of irregularities in purchase of fire rescue vehicle | फायर रेस्क्यू वाहन खरेदीतील अनियमिततेची जलद चौकशी

फायर रेस्क्यू वाहन खरेदीतील अनियमिततेची जलद चौकशी

Next
ठळक मुद्देआयुक्तांचे आदेश : कार्यकारी अभियंत्याकडे जबाबदारी

प्रदीप भाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेने तब्बल २.०४ कोटी रुपये खर्चून घेतलेल्या मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहनातील अनियतमिततेची चौकशी करण्याची आदेश आयुक्त हेमंत पवार यांनी दिले आहेत. २५ मे रोजी आयुक्तांनी हे आदेश काढले असून, चौकशीची जबाबदारी कार्यकारी अभियंता (१) अनंत पोतदार यांच्याकडे देण्यात आली आहे.
‘शनिवारी डिलिव्हरी; सोमवारी १.९४ कोटी बहाल’, ‘फायर रेस्क्यू वाहन खरेदीतील अनियमितता’, ‘टॉप टू बॉटम सारेच धनी, मास्टरमाइंड महापालिकेबाहेरचा?’ आणि ‘भ्रष्टाचार दडपविण्यासाठी बॅकडेटेड पत्रव्यवहार’ या मालिकेतून ‘लोकमत’ने फायर वाहनखरेदीतील अनियमितता आणि त्यावर पांघरुण घालण्याचा प्रशासनातील काहींनी चालविलेला प्रयत्न लोकदरबारात मांडला. त्या वृत्तमालिकेची दखल आयुक्त हेमंत पवार यांनी घेतली. उपायुक्त नरेंद्र वानखडे आणि अग्निशमन अधीक्षक भारतसिंह चौव्हाण यांच्याकडून त्यांनी फायर वाहन खरेदीबाबत करण्यात आलेली निविदा प्रक्रिया, कंपनीकडून वाहनाचा झालेला पुरवठा आणि देयकाबाबत माहिती जाणून घेत जाब विचारला. त्यानंतर या प्रकरणातील संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश पारित केले. चौकशीअंती संबंधितांविरुध्द कारवाईची दिशा निश्चित केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
असा आहे आदेश
महापलिकेच्या अग्निशमन विभागाद्वारे मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदी करण्यात आले. याबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त होत असून, वृत्तपत्रातदेखील त्या अनुषंगाने बातम्या प्रसिद्ध होत आहेत. सबब, याबाबत राबविण्यात आलेल्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याकरिता प्र-कार्यकारी अभियंता अनंत पोतदार यांची नेमणूक करण्यात येत असल्याची बाब आदेशात नमूद आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल त्वरित देण्याचे निर्देश पोतदार यांना देण्यात आले आहेत.
अग्निशमन अधीक्षकांना पोतदारांचे पत्र
याप्रकरणी संपूर्ण नस्ती , पत्रव्यवहार, बातम्यांची कात्रणे, इतर आक्षेप आदी संपूर्ण पत्रव्यवहार २८ मे रोजी न चुकता आपल्याकडे सादर करावा तसेच आपल्या विभागातील एका जाणकार व्यक्तीची या कामासाठी नियुक्ती करावी, अशी सूचना पोतदार यांनी अग्निशमन अधीक्षकांना केली आहे.
यांच्याकडे झाल्यात तक्रारी...: मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहनाच्या निविदा प्रक्रियेसह किमतीवर आक्षेप नोंदविणाºया अनेक तक्रारी मुख्यमंत्र्यांसह नगरविकास विभाग, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व लोकायुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. बाजारभावाची शहानिशा न करता दुप्पट किमतीत हे वाहन खरेदी करण्यात आल्याचा मुख्य आरोप आहे.

मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीबाबत बºयाच तक्रारी प्राप्त झाल्यात. त्याअनुषंगाने या संपूर्ण प्रक रणाची चौकशी करण्यासाठी आदेश पारित केलेत. चौकशीअंती कारवाईची दिशा निश्चित होईल.
- हेमंतकुमार पवार,
आयुक्त , महापालिका

Web Title: Quick probe of irregularities in purchase of fire rescue vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.