रबी हंगाम नोंदणीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:08+5:302021-05-21T04:14:08+5:30
ज्या शेतकऱ्यांची नोंदणी ३० एप्रिलपर्यंत झाली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक नरेंद्र रणमाले यांनी ...
ज्या शेतकऱ्यांची नोंदणी ३० एप्रिलपर्यंत झाली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक नरेंद्र रणमाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
धारणी तालुक्यात बैरागड, चाकर्दा, सादरावाडी आणि सावलीखेडा येथे आदिवासी विकास महामंडळातर्फे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. चिखलदरा तालुक्यांतर्गत चुरणी आणि गौलखेडा बाजार येथे सुद्धा रबी हंगामातील खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्याकरिता संबंधित शेतकऱ्यांनी आपापल्या केंद्रामध्ये दस्तावेजसह ऑनलाइन नोंदणी करून घेण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी आणि प्रादेशिक व्यवस्थापक नरेंद्र रणमाले यांनी केली आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याने अद्ययावत सातबारा उतारा, बँक पासबुकाची छायाप्रत आणि आधार कार्डची छायाप्रत सोबत जोडावी लागणार आहे.