दोन लाख हेक्टरमध्ये रबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:38 PM2017-10-04T23:38:15+5:302017-10-04T23:38:40+5:30

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असला तरी परतीच्या पावसाने शेजमिनीतील वाढलेली आर्द्रता रबीसाठी पोषक आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा दोन लाख २८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात रबी राहणार आहे.

Rabi in two lakh hectare | दोन लाख हेक्टरमध्ये रबी

दोन लाख हेक्टरमध्ये रबी

Next
ठळक मुद्देपरतीच्या पावसाने दिलासा : १ लाख ६० हजार हेक्टरमध्ये हरभºयाचे क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असला तरी परतीच्या पावसाने शेजमिनीतील वाढलेली आर्द्रता रबीसाठी पोषक आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा दोन लाख २८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात रबी राहणार आहे. मागील वर्षी एक लाख ५१ हजार हेक्टरमध्ये रबीची पेरणी झाली होती. यंदा सर्वाधिक एक लाख ६० हजार क्षेत्रात हरभरा व ६५ हजार हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी होणार आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासूनच पावसाची अपेक्षित सरासरी कमी आहे. यंदाचा पावसाळा संपायला चार दिवस उरले असतानाही ३१ टक्के पावसाची तूट आहे. मात्र १८ सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू झाल्यावर जिल्ह्यात सरासरीच्या १० टक्के पाऊस पडला व याच कालावधीत पूर्णा व उर्ध्ववर्धा प्रकल्पाच्या क्षेत्रात दमदार पाऊस पडला. तसेच मध्यप्रदेशातही दमदार पाऊस झाल्याने पाण्याचा येवा वाढून या दोन्ही प्रकल्पांत मुबलक साठा झाला. त्यामुळे रबी पिकाला दिलासा मिळणार आहे. यंदाच्या खरिपात पावसाच्या दडीअभावी नापेर राहिलेले मूग, उडीद व सोयाबीनचे क्षेत्र व जमिनीत झालेली आर्द्रतावाढ यामुळे यंदा रबीची क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०१४ मध्ये १,७४,४८२ हेक्टर, २०१५ मध्ये १,४३,०२० हेक्टर, तर २०१६ मध्ये १,६४,००२ हेक्टर रबीसाठी सरासरी क्षेत्र होते.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा ३०० हेक्टर क्षेत्र रबी ज्वारसाठी प्रस्तावित आहे. करडई १५० हेक्टर व मका २,३०० हेक्टर राहणार आहे.

Web Title: Rabi in two lakh hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.