अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राडा
By गणेश वासनिक | Published: September 11, 2022 12:40 PM2022-09-11T12:40:25+5:302022-09-11T12:41:36+5:30
अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठी चार्ज करून परिस्थिती नियंत्रण आणली.
अमरावती : राज्यात दुसऱ्या क्रमांकाची असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून प्रारंभ झाली. मतदान प्रक्रिया सुरू असताना मोर्शी वरुडचे आमदार देवेंद्र भुयार हे थेट मतदान केंद्रात गेले. मात्र त्यांचे मतदान नाही त्यांना आतमध्ये प्रवेश केला कसा? अशी विचारणा विकास पॅनलच्यावतीने करण्यात आली. त्यानंतर यावरून वाद झाला. तू -तू मै- मै झाली. दोन्ही गट अमोर- समोर आले. अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठी चार्ज करून परिस्थिती नियंत्रण आणली.
आमदार देवेंद्र भुयार यांचे मतदान नसताना ते केंद्रावर केंद्राच्या गेल्यामुळे दोन गटात प्रचंड वाद झाला, हे वास्तव आहे. त्यांनतर काही जणांनी मतदान केंद्रात प्रवेश केल्यामुळे वाद जास्त उफाळून आला. कालांतराने हा वाद आटोक्यात आला. मात्र पहिल्यांदाच श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अशा प्रकारे वाद झाल्याची घटना घडली. विकास पॅनल आणि प्रगती पॅनल यांच्या ही निवडणूक चांगली चुरशीची होत आहे. या निवडणुकीत ७७४ आजीवन सभासदाना मतदानाचा अधिकार आहे.