नांदगावपेठेत दोन गटात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:43 PM2018-07-02T23:43:39+5:302018-07-02T23:44:02+5:30

नांदगाव पेठ स्थित बन्नेखा चौकातील विशिष्ट समुदायातील धार्मिक स्थळासमोरून जाणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाला मारहाण झाल्याची घटना घडल्याने रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हाणामारीत चार वऱ्हाडी जखमी झाले. याप्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी सोमवारी दोन्ही गटांच्या आठ जणांना अटक केली. या घटनेच्या अनुषंगाने नांदगाव पेठ बंद ठेवण्यात आले होते.

Rada in two groups in Nandgaonpeth | नांदगावपेठेत दोन गटात राडा

नांदगावपेठेत दोन गटात राडा

Next
ठळक मुद्देलग्न वऱ्हाडाला मारहाण : पोलीस बंदोबस्तानंतर तणावपूर्ण शांतता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदगाव पेठ स्थित बन्नेखा चौकातील विशिष्ट समुदायातील धार्मिक स्थळासमोरून जाणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाला मारहाण झाल्याची घटना घडल्याने रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हाणामारीत चार वऱ्हाडी जखमी झाले. याप्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी सोमवारी दोन्ही गटांच्या आठ जणांना अटक केली. या घटनेच्या अनुषंगाने नांदगाव पेठ बंद ठेवण्यात आले होते.
नांदगाव पेठ येथील रहिवासी प्रकाश भोपळे यांनी पोलिसांकडे रविवारी उशिरा रात्री तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, त्यांचे चुलतभाऊ आशिष रामदास भोपळे यांचे सोमवारी चांदूरबाजार येथे लग्न होते. यानिमित्त रविवारी सायंकाळी ७ वाजता वरात काढली. ती वाजत-गाजत बारीपुरा चौकातून रात्री ८.४५ वाजता बन्नेखा चौकातील विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळासमोरून जात असताना शारूख बशीरखाँ पठाण हा हाती भाला घेऊन आला. त्याचा भाल्याचा वार प्रकाश भोपळे यांनी अडविल्याने ते जखमी झाले. यादरम्यान वाद उफाळून आल्यावर शारूखसह सलमान बशीरखाँ पठाण, सादीक, सकीम व अन्य १० ते १२ जणांनी वरातीमधील नितीन राऊत, अनिकेत बाळस्कर, प्रज्वल भोपळे, कविता भोपळे, बेबी अंबाडकर, नंदा टारपे, शालिनी भोपळे, सविता भोपळे (रा.यावलपुरा) यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशिष्ट समुदायातील जमावाने वऱ्हाडींवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. या घटनेनंतर रात्री ९ वाजता संतप्त वऱ्हाडी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात धडकले आणि प्रचंड घोषणाबाजी करीत आरोपींवर कारवाईची मागणी केली. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विशिष्ट समुदायातील जमावाने दिलेल्या तक्रारीनुसार, वरात बन्नेखा चौकातून जात असताना प्रार्थना सुरू होती. यामुळे वऱ्हाडी मंडळीला बँड वाजविण्यास मनाई केल्याने वाद उफाळून आला.
दोन्ही गटांतील आठ जणांना अटक
नांदगाव पेठेत या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस अधिकाºयांना योग्य निर्देश दिले. सोमवारी गावात तणावपूर्ण शांतता होती. त्यामुळे पोलिसांचा मोठा ताफा नांदगाव पेठेत तैनात आहे. पोलिसांनी वºहाडी मंडळीच्या तक्रारीवरून विशिष्ट समुदायातील नागरिकांवर गुन्हे नोंदविले असून, चार जणांना अटक केली. विशिष्ट समुदायातील नागरिकांच्या तक्रारीवरून चार वºहाडी व बँड पथकातील दोघांना अटक करण्यात आली. याशिवाय सरकारतर्फे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

नांदगावपेठेतील घटनेत परस्परविरोधी तक्रारीशिवाय सरकारतर्फे तक्रार नोंदविण्यात आली आहे. सद्यस्थितीत दोन्ही गटांतील चार जणांना अटक केली आहे. अशाप्रकारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाईल.
- दत्तात्रय मंडलिक
पोलीस आयुक्त.

Web Title: Rada in two groups in Nandgaonpeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.