राफ्टरने हल्ला चढवून युवकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:12 AM2021-05-01T04:12:27+5:302021-05-01T04:12:27+5:30

पोलीस सूत्रांनुसार, वैभव भीमराव तायडे (२०, रा. चवरेनगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी आरोपी दीपक ...

Rafter attacked and brutally killed a youth | राफ्टरने हल्ला चढवून युवकाची निर्घृण हत्या

राफ्टरने हल्ला चढवून युवकाची निर्घृण हत्या

Next

पोलीस सूत्रांनुसार, वैभव भीमराव तायडे (२०, रा. चवरेनगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी आरोपी दीपक अशोक तुरुक (रा. स्वागतम कॉलनी), संकेत सुरेश घुगे (रा. आदर्शनगर) आणि शिवम शरद कुकडे (रा. फॉरेस्ट कॉलनी, साईनगर) या तिघांनाही रात्रीच अटक केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक किशोर शेळके, पोलीस उपनिरीक्षक काठेवाडे यांच्यासह ताफा घटनास्थळी पोहोचला. मृताला नातेवाइकांनी इर्विन रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिन्ही आरोपींना न्यायालयाने ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी फिर्यादी आकाश रूपचंद गेडाम (२१ रा. चवरेनगर) याच्या तक्रारीनुसार, आकाशची बहीण अश्विनी सुनील कटकतलवारे ही न्यू विजय कॉलनीतील हरिहर रामराव बोचरे यांच्याकडे एक वर्षापासून भाड्याने राहते. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास जावई सुनील यांनी फोन कॉल करून घरासमोर काही तरुण शिवीगाळ व दगडफेक करीत असल्याचे सांगितले. ते ओळखीतील असल्याचे आकाशने कळविले. लग्न समारंभातून त्याच्यासह मित्र श्रेयस गडेकर, संकेत ऊर्फ गोलू नारळे व वैभव तायडे हे न्यू विजय कॉलनीत पोहोचले. त्यांनी शिवीगाळ करणाऱ्या दीपक तुरुकला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपींनी बांधकामस्थळावरील राफ्टरने हल्ला चढविला. यात वैभव तायडे हा जागीच ठार झाला.

बॉक्स

राजापेठ हद्दीत आठवडाभरात हत्येच्या दोन घटना

राजापेठ ठाण्याच्या हद्दीत आठवडाभरात हत्येच्या दोन घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच जेवडनगर येथे अमन खंडारे नामक युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असताना गुरुवारी रात्री न्यू विजय कॉलनीत युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली.

Web Title: Rafter attacked and brutally killed a youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.