रघुवीरच्या लाडूत काच एफडीएत जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:23 AM2017-11-28T00:23:57+5:302017-11-28T00:24:51+5:30

रघुवीर मिठाईयामधून विकत घेतलेल्या मोतीचूर लाडूत चक्क काचेचा तुकडा आढळल्याने एकच खळबळ उडाली.

Raghuveer's Ladut glass FDT strongly shouting | रघुवीरच्या लाडूत काच एफडीएत जोरदार घोषणाबाजी

रघुवीरच्या लाडूत काच एफडीएत जोरदार घोषणाबाजी

Next
ठळक मुद्देखळबळ : जिल्हाधिकारी, पोलीस, अन्न प्रशासनात तक्रारी

आॅनलाईन लोकमत
अमरावती : रघुवीर मिठाईयामधून विकत घेतलेल्या मोतीचूर लाडूत चक्क काचेचा तुकडा आढळल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी रघुवीर मिठाई संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी सदर ग्राहकाने एफडीएकडे सोमवारी तक्रार दिली. रघुवीरच्या संचालकाला अटक करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली.
सतीश विठ्ठलराव देशमुख यांनी २५ नोव्हेंबर रोजी श्याम चौकातील रघुवीर मिठाईया प्रतिष्ठानातून दीड किलो बुंदीचे मोतीचूर लाडू विकत घेतले. अंबादेवी मंदिरात जाऊन पूजा केली असता सतीश देशमुख यांच्या पत्नी प्रमिला देशमुख यांनी लाडू खाल्ला तेव्हा त्यांना काचेचा तुकडा आढळला. यानंतर देशमुख दाम्पत्यांनी सिटी कोतवाली ठाणे गाठून याबाबत रितसर तक्रार दिली. सदर प्रकरण अन्न व प्रशासन विभागाशी संबंधित असल्याने देशमुख व त्यांच्या मित्रांनी सोमवारी एफडीएचे सह. आयुक्त सुरेश अन्नपुरे व सहायक आयुक्त सचिन केदारे यांच्याकडे प्रकरण सादर केले. लाडुत काचेचा तुकडा निघाल्याप्रकरणी त्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. परंतु अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार प्रथम रघुवीरच्या प्रतिष्ठानाची तपासणी केली जाईल. यानंतर त्यांना सुधारणा नोटीस बजावण्यात येईल, असे सह आयुक्तांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एफडीए कार्यालयाबाहेर प्रचंड घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात ‘रघुवीर’चा प्रताप मांडताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकारच्या पदाधिकाऱ्यांनी सदर घटनेचा निषेध केला. दरम्यान रघुवीर संचालकांनी सुद्धा सतीश देशमुख यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
यापूर्वी कचोरीत आढळली होती अळी
रघुवीर प्रतिष्ठानात यापूर्वीही कचोरीत तळलेली अळी आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणात यापूर्वीही एफडीएने रघुवीर प्रतिष्ठानाला नोटीस बजावली होती. आता लाडूत काचेचा तुकडा आढळल्याने एफडीए काय कारवाई करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

यासंबंधाने मी गंभीर नोंद घेतली आहे. जातीने लक्ष देतो. दोषी आढल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही.
- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी, अमरावती

तक्रारीनंतर काचेचा तुकडा मागविला. तो साखरेचा गडाही असू शकतो. त्यांनी आम्हाला तो काच दाखविला नाही.
चंद्रकांत पोपट,
संचालक रघुवीर प्रतिष्ठान

 

Web Title: Raghuveer's Ladut glass FDT strongly shouting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.