रहिमापूर पोलिसांनी कत्तलीच्या बैलांना दिले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:13+5:302021-07-15T04:11:13+5:30

वनोजा बाग : खासदार नवनीत राणा यांच्या गावंडगाव, सातेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी कत्तलीसाठी नेण्यात येत असलेले ...

Rahimapur police gave life to the slaughtered bulls | रहिमापूर पोलिसांनी कत्तलीच्या बैलांना दिले जीवनदान

रहिमापूर पोलिसांनी कत्तलीच्या बैलांना दिले जीवनदान

googlenewsNext

वनोजा बाग : खासदार नवनीत राणा यांच्या गावंडगाव, सातेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी कत्तलीसाठी नेण्यात येत असलेले १४ बैलांची सुटका केली. अंजनगाव-मलकापूर-सातेगाव मार्गावर गोपनीय माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई १२ जुलै रोजी केली.

रहिमापूरचे ठाणेदार सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात मलकापूर पुलाजवळ आडोशाने बसले. अंजनगाव-मलकापूर मार्गाने दोन इसम थोड्या वेळात १४ बैल हाकत आणत असताना त्यांना दिसले. शेख अलीम शेख गनी (३३) व शेख रज्जाक शेख राउफ (४५, रा. झाडीपुरा, पिंपळोद) यांना बैलाची पावती मागितली. मात्र, पावती न देता त्यांनी बनावट नावे सांगितली. अखेर ४ लाख ४२ हजार रुपये किमतीचे बैल ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस कर्मचारी रवींद्र निंबाळकर, दुधारम चव्हाण, राजेश मोहोड यांनी ही कारवाई केली.

Web Title: Rahimapur police gave life to the slaughtered bulls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.