रहमानला अटक, हत्येचे गूढ कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:48 PM2018-03-25T23:48:27+5:302018-03-25T23:48:27+5:30

सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुनील गजभियेच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री खामगावातून अटक केली. रहमान इब्राहिमखान पठाण (४१,रा. ताजनगर) असे आरोपीचे नाव आहे. मात्र, त्याच्या चौकशीनंतरही शीतलच्या हत्येचे गूढ कायम आहे.

Rahman has been arrested, the mystery of murder always | रहमानला अटक, हत्येचे गूढ कायमच

रहमानला अटक, हत्येचे गूढ कायमच

Next
ठळक मुद्देशीतल पाटील हत्याकांड : १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमत
अमरावती : सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुनील गजभियेच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री खामगावातून अटक केली. रहमान इब्राहिमखान पठाण (४१,रा. ताजनगर) असे आरोपीचे नाव आहे. मात्र, त्याच्या चौकशीनंतरही शीतलच्या हत्येचे गूढ कायम आहे.
रहमानला न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पर्यंतची पोेलीस कोठडी सुनावली आहे.
शीतलचा मृत्यू डोक्याच्या आत मार लागल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात आहे. तीची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकण्याचा आल्याचा संशय पोलिसांना आहे.
रहमानला तीन दिवसांचा पीसीआर
शीतल पाटील यांची आत्महत्या की घातपात याचा शोध लावताना पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे. शनिवारी रात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रहमानला खामगाव रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. रहमान हा घटनेच्या दिवशी गजभिये व शीतलसोबत होता. चांदूरबाजारला जाण्यापूर्वी रहमानने गजभिये व त्याचा मोबाईल घरी नेऊन ठेवला.
त्यानंतर तिघेही चांदूरबाजार मार्गे गेले. रात्री उशिरा तिघेही कारने एक्सप्रेस हायवेकडे येत असताना गजभिये व शीतल यांच्यात वाद सुरूहोते. विहिरीजवळ गजभियेने कार थांबविली. त्यानंतर शीतल व गजभिये खाली उतरून विहिरीजवळ गेले. त्यावेळी रहमान कारमध्ये बसून होता. विहिरीकडून शीतलच्या ओरडण्याचा व विहिरीत दगड पडल्यासारखा आवाज आला आणि त्यानंतर शीतलने आत्महत्या केल्याचे गजभियेने रहमानला सांगितले. तेथून गजभियेने रहमानला घरी सोडून दिले. असे बयाण रहमानने पोलिसांना चौकशीअंती दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रहमान एका ट्रकमधून मूर्तिजापूरपर्यंत गेला. तेथील चुलत भावाकडून मोबाईल सिम घेतले आणि मुंबई येथील हाजी अली दर्ग्यात दर्शनासाठी गेला. तेथून गुजरात, अजमेर, इंदूर, बऱ्हाणपूर प्रवास केल्यानंतर तो खामगावला आला. खामगावच्या रेल्वेस्थानक परिसरात राहणाऱ्या एका परिचित व्यक्तीच्या घरी रहेमानने आश्रय घेतला. तेथून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रहमानला अटक केली. रविवारी रहमानला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
विहीर मालकाला नोटीस
एक्सप्रेस हायवेवरील ती विहीर ओम खेमचंदानी यांच्या शेतात आहे. तेथे देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याचे घटनास्थळी आढळून आलेल्या आक्षेपार्ह साहित्यांवरून पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे विहिरीला व शेताला सरंक्षण कुंपण लावण्यासंदर्भात खेमचंदानीला सूचना देण्यात आल्या आहेत.
सीपींकडून स्पॉटची पाहणी
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी रविवारी एक्सप्रेस हायवेवरील शीतलच्या हत्येच्या घटनास्थळाची पाहणी केली. आरोपी गजभियेच्या चौकशीनंतर घटनेच्या दिवशी नेमके काय झाले असावे, यांचा अंदाज आयुक्तांनी घेतला.
गजभियेची उलट तपासणी
शनिवारी रात्री सुनिल गजभियेला पुन्हा सीपी दत्तात्रय मंडलिकांसमोर हजर केले असता त्याची उलट तपासणी करण्यात आली, मात्र, शीतलने आत्महत्याच केल्याच्या बयाणावर गजभिये ठाम असल्याचे दिसून आले.

Web Title: Rahman has been arrested, the mystery of murder always

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.