आकोली मार्गावरील साहू ले-आऊटमधील कुंटणखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:00 AM2021-02-06T05:00:00+5:302021-02-06T05:00:47+5:30
साईनगर ते अकोली मार्गालगत साहू ले-आऊटमधील एका घरात कुंटणखाना चालविला जात होता. त्यामुळे परीसरातील नागरिक त्रस्त झाले होते. ज्या घरात कुंटणखाणा सुरू होता, ते घर खोलापुरी गेट व बडनेरा पोलीस ठाण्याच्या सीमेवर येत असल्यामुळे परिसरातील नागरिक तक्रार द्यायची कुणाला, या विचारात होते. यादरम्यान परिसरात सातत्याने वेगवेगळे युवक दुचाकीने येत असे. काही दिवसांपूर्वी महिलांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रारदेखील केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आकोली मार्गावरील खंडेलवाल नगरातील साहू ले-आउटमध्ये काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून महिलेसह दोन युवती व एका युवकाला ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. आरोपी वैभव ओंकार ढेले (२३, रा. खेर्डा, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) व एका महिलेविरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
साईनगर ते अकोली मार्गालगत साहू ले-आऊटमधील एका घरात कुंटणखाना चालविला जात होता. त्यामुळे परीसरातील नागरिक त्रस्त झाले होते. ज्या घरात कुंटणखाणा सुरू होता, ते घर खोलापुरी गेट व बडनेरा पोलीस ठाण्याच्या सीमेवर येत असल्यामुळे परिसरातील नागरिक तक्रार द्यायची कुणाला, या विचारात होते. यादरम्यान परिसरात सातत्याने वेगवेगळे युवक दुचाकीने येत असे. काही दिवसांपूर्वी महिलांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रारदेखील केली होती. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी रात्री ९ वाजता धाड टाकून वैभवसह २७ वर्षीय महिला आणि २१ व २२ वर्षीय युवतींना ताब्यात घेतले. आरोपींना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, तर युवतींना नागपूर येथील पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, सायबरच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर व त्यांच्या पथकाने केली.
आरोपीकडून दोन मोबाईल जप्त
पोलिसांनी वैभव ढेले याच्याकडून २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल तसेच रोख तीन हजार असा एकूण २३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर पुरुष व महिला आरोपीने युवतींकडून वेश्याव्यवसाय करून घेण्याकरिता या ठिकाणी भाड्याने रूम केली होती.
बनावट ग्राहक पाठवून घेतले ताब्यात
आरोपी महिला बाहेरून मुलींना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी दोन बनावट ग्राहक पाठवून त्यांच्याजवळ ५०० रुपयांच्या प्रत्येकी सहा नोटा देण्यात आल्या. ही रक्कम कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेस दिल्यानंतर त्यांना दोन युवती पुरविण्यात आल्या. यानंतर आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी धाड टाकली. दोन मुली त्यांना रूममध्ये मिळून आल्या. या घटनेेने परिसरात खळबळ उडाली आहे.