आकोली मार्गावरील साहु ले-आऊटमधील कुंटणखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:38+5:302021-02-06T04:22:38+5:30
अमरावती : आकोली मार्गावरील खंडेलवाल नगरातील साहू ले-आउटमध्ये गत काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड ...
अमरावती : आकोली मार्गावरील खंडेलवाल नगरातील साहू ले-आउटमध्ये गत काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून महिलेसह दोन युवती व एका युवकाला ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. आरोपी वैभव ओकांर ढेले (२३, रा. खेरडा ता. कारंजा), एका महिलेविरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
साई नगर ते आकोली मार्गालगत ले-आउटमधील एका घरात कुंटणखाना चालविला जात होता. त्यामुळे परीसरातील नागरीक हैराण झाले होते. ज्या घरात कुंटनखाणा सुरु होता ते घर खोलापुरी गेट व बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीमेवर येत असल्यामुळे परिसरातील नागरिक तक्रार द्यायची कुणाला या विचारात होते. मात्र, सतत परिसरात वेगवेगळे युवक दुचाकीने येत असे. महिलांना वाईट नजरेने पाहत असल्यामुळे परिसरातील महिला त्रस्त झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी परिसरातील महिलांनी पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रारदेखील केली होती. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी रात्री ९ वाजता साहू ले-आउटमधील त्या घरी धाड टाकून एका महिलेसह दोन युवतींना व एका युवकाला ताब्यात घेतले. घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना दिली. बडनेरा पोलिसांनी पीटा ॲक्टनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बॉक्स:
बनावट ग्राहक पाठवून घेतले ताब्यात
आरोपी महिला बाहेरून मुलींना आणून त्यांच्याकडून वेशा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी दोन बनावट ग्राहक पाठवून त्यांच्याजवळ ५०० रुपयांच्या प्रत्येकी सहा नोटा देण्यात आले. सदर सहा हजार रुपये कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेस ग्राहकांनी दिल्यानंतर त्यांना शरीर संबंध ठेवण्याकरिता दोन युवती पुरविण्यात आल्या. आधीच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी धाड टाकली तेव्हा दोन मुली त्यांना रूममध्ये मिळून आल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बॉक्स:
आरोपीकडून दोन मोबाईल जप्त
पोलिसांना घटनास्थळी मिळून आलेल्या वैभव ढेले याच्याकडून २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले. तसेच नगदी ३ हजार असा एकूण २३ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदर पुरुष व महिला आरोपीने युवतीकडून वैश्याव्यवसाय करून घेण्याकरिता या ठिकाणी भाड्याने रूम केली होती.