नवाथेनगर येथे अवैध सावकाराकडे धाड; वर्षभरात २२ धाडसत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:18 IST2024-12-06T11:16:49+5:302024-12-06T11:18:06+5:30

सहकार'ची कारवाई : खरेदीखत मिळाल्याची माहिती

Raid on illegal moneylenders in Nawathenagar; 22 sessions in a year | नवाथेनगर येथे अवैध सावकाराकडे धाड; वर्षभरात २२ धाडसत्र

Raid on illegal moneylenders in Nawathenagar; 22 sessions in a year

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
सहकार विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पथकाने नवाथेनगरातील एका अवैध सावकाराकडे गुरुवारी धाड टाकली. यात मुद्रांक व २४ स्थावर मालमत्तेचे खरेदीखत व दहा ७/१२ मिळाल्याची माहिती पथकाने दिली.


तिवसा सहायक निबंधक कार्यालयाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या निर्देशाने पथकाचे गठन करण्यात आले होते. यात अमरावती तालुका सहायक निबंधक सचिन पतंगे यांच्या नेतृत्वात गुरूवारी नवाथेनगरातील गल्ली क्रमांक ४ मधील गजानन लसनकर यांच्या घरी पथकाने धाड टाकली. यावेळी ते अनुपस्थित होते. त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीत पथकाने घराची तपासणी केली. त्यात काही मुद्रांक, स्थावर मालमत्तेच्या २४ खरेदीखत, दहा शेताचे सात बारा त्यात काही मुळ प्रति मिळाल्याचे सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी सांगितले. या पथकात तिवसा सहायक निबंधक कार्यालयाचे मनोज रोहनकर, अजहरखान, शितल राठोड व राजापेठ पोलिस ठाण्यातील अंमलदारांचा समावेश होता. कागदपत्रांची अवैध सावकारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात येईल व त्यानंतर सुनावणी होणार असल्याचे सहकार विभागाने 'लोकमत'ला सांगितले. 


सहकार विभागाच्या वर्षभरात २२ धाडसत्र 
अवैध सावकारीवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली गत ११ महिन्यांत २२ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यात धामणगाव रेल्वे तालुक्यात ५ (एक मंगरूळ दस्तगीर), नांदगाव खंडेश्वर १ (यवतमाळ जिल्ह्यकातील दारव्हा तालुक्यात वर्ग), मोर्शी तालुक्यात २, अमरावती तालुक्यात पोहरा बंदी १ आणि अमरावती शहरात १५ पेक्षा जास्त अवैध सावकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरासह गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी सुरू असताना पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. अवैध सावकारांमुळे अनेकांची घरे, शेती, प्लॉट आदी मालमत्ता बळकावण्यात आल्या आहेत.

Web Title: Raid on illegal moneylenders in Nawathenagar; 22 sessions in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.