खोलाड नदीवरील गावठी दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:13 AM2021-05-06T04:13:56+5:302021-05-06T04:13:56+5:30
६४ हजारांचा मुद्देमाल जप्त, चांदूर रेल्वे पोलिसांची कारवाई चांदूर रेल्वे : मालखेड तलावाजवळील खोलाड नदीवर सुरू असलेल्या गावठी दारूभट्टीवर ...
६४ हजारांचा मुद्देमाल जप्त, चांदूर रेल्वे पोलिसांची कारवाई
चांदूर रेल्वे : मालखेड तलावाजवळील खोलाड नदीवर सुरू असलेल्या गावठी दारूभट्टीवर धाड टाकून ६४ हजारांचा मुद्देमाल चांदूर रेल्वे पोलिसांनी ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात नष्ट केला. ५ मे रोजी सकाळी ८ वाजता ही कारवाई करण्यात आली.
पोलीस सूत्रांनुसार, चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड परिसरातील खोलाड नदीजवळ अवैध गावठी दारू गाळण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी सकाळी ८ वाजता धाड टाकली. यामध्ये १२७५ लिटर मोहमाच व इतर साहित्य असा एकूण ६४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ते सर्व नष्ट करण्यात आले. याप्रकरणी आरोपी महादेव शालिकराम नाईक (३८) व उमेश ज्ञानेश्वर काळे (३०, दोन्ही रा. सावंगा विठोबा) हे पसार झाले आहेत. ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे, हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण शिरसाट, संजय राठोड, विनोद डाखोरे, कॉन्स्टेबल प्रफुल्ल माळोदे, आशिष राऊत व सात होमगार्ड यांच्या पथकाने केली.