अमरावतीत १० सावकारांच्या घरी छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 04:14 PM2020-02-14T16:14:51+5:302020-02-14T16:15:10+5:30
सहकार खात्याच्या विशेष पथकांनी अमरावती शहरातील १० सावकारांच्या घरी गुरुवारी छापे मारले. १८ लाख ८८ हजार १०० रुपये रोख, धनादेश, खरेदीखत आदी कागदपत्रे या कारवईत जप्त करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सहकार खात्याच्या विशेष पथकांनी अमरावती शहरातील १० सावकारांच्या घरी गुरुवारी छापे मारले. १८ लाख ८८ हजार १०० रुपये रोख, धनादेश, खरेदीखत आदी कागदपत्रे या कारवईत जप्त करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
ए.आर. स्वाती गुडधे यांच्या पथकाने आझाद कॉलनीतील एकाच घरातून १६ लाख ९० हजार २०० रुपये तसेच संबंधित मुद्देमाल जप्त केला. येथील सहायक निबंधकांना प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे एकूण ११ पथकांनी दहा सावकांरांच्या घरांवर एकाचवेळी हे छापे मारले. या सावकारांची सावकारकी अवैध असल्याचे यातून उघड झाले.
महाराष्ट्र सावकारी अधिनियम १९१४ च्या तरतुदीप्रमाणे सर्व दहा जणांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी दिली.
सहायक निबंधक राजेंद्र पालेकर, अच्युत उल्हे, सहदेव केदारे, राजेश भुयार, कल्पना घोपे, राजेंद्र मदारे, सचिन पतंगे, बी.एस. पाटील, प्रीती धामणे, जी.पी. राऊत आदींच्या पथकांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या धाडसत्रामुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.