रेल्वे प्रशासनाचे ‘घर चलो अभियान’

By admin | Published: February 11, 2017 12:08 AM2017-02-11T00:08:07+5:302017-02-11T00:08:07+5:30

रेल्वे प्रशासनाने चालकांच्या कुटुंबियांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ‘घर चलो अभियान’ या नव्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

Railway Administration's 'Come Home Campaign' | रेल्वे प्रशासनाचे ‘घर चलो अभियान’

रेल्वे प्रशासनाचे ‘घर चलो अभियान’

Next

कुटुंबीयांसोबत सुरक्षा संवाद : चालकांचे प्रश्न, समस्या जाणून घेणार
अमरावती : रेल्वे प्रशासनाने चालकांच्या कुटुंबियांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ‘घर चलो अभियान’ या नव्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. सामाजिक जाणीवेतून सुरु करण्यात झालेल्या या उपक्रमाद्वारे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी चालकांच्या कुटुंबियासोबत सुरक्षा संवाद साधणार आहे.
रेल्वे चालविणे सोपे नाही. हजारो प्रवाशांना सुरक्षितस्थळी पोहचविताना चालकांची एकाग्रता महत्वाची आहे. त्यामुळे रेल्वे चालक कर्तव्यावर असताना त्यांना ताण- तणाव, कुटुंबाची चिंता सतावू नये, यासाठी वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कुटुंबियासोबत सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक समस्या, प्रश्नांची जाण करुन घेणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने हा उपक्रम सुरु केला असून पुणे, मुंबईनंतर अमरावती, अकोला, बडनेरा, नागपूर आदी ््रमुख रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या चालकांच्या कुटुंबियोसाबत अधिकारी सुरक्षा संवाद साधणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात ताण- तणाव, वाद- विवाद होत राहतात. त्यामुळे चालक कर्तव्यावर असताना त्यांना कुटुंबियांची चिंता सतावणार नाही, घरचे वातावरण आनंदी राहावे, ही दखल सुरक्षा संवादातून घेतली जाणार आहे. रेल्वे चालकांच्या हाती अनेकांचे आयुष्य राहते. एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर प्रवाशांना नेताना चालकांची एकाग्रता कायम राहावी. तसेच त्यांच्या मनात समस्यांनी घर करु नये, हे सुरक्षा संवाद मागील हेतू असल्याचे दिसून येते. चालक कर्तव्यावर असताना त्यांचे मन आनंदी कसे राहील, हे सुरक्षा संवादातून अधिकारी त्यांच्या कुटुंबियांना आवाहन करणार आहे.गत महिन्यात रेल्वेचे अपघात झाल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. (प्रतिनिधी)

अपघात रोखण्यासाठी चालकांना मार्गदर्शन
मध्य रेल्वे विभागाने चालकांच्या कुटुंबियांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ‘घर चलो अभियान’ सुरु केले आहे. या माध्यमातून चालक पती-पत्नी, मुलाबाळांसोबत संवाद साधताना अधिकारी कौटुंबिक बाबीदेखील नमूद करणार आहेत. मात्र, चालकांनी रेल्वे अपघात कसे रोखावे, यासाठी प्रशासन त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Railway Administration's 'Come Home Campaign'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.