रेल्वेचे सामान्य तिकीट मोबाईलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:14 PM2018-03-21T22:14:38+5:302018-03-21T22:14:38+5:30

रेल्वे खिडक्यांवर अनारक्षित तिकीट मिळविण्यासाठी लांबलचक रांगेत तासन्तास उभे राहण्याची भानगड आता संपुष्टात आली असून, सामान्य तिकीट आता मोबाईलवर मिळणार आहे.

Railway general tickets on mobile | रेल्वेचे सामान्य तिकीट मोबाईलवर

रेल्वेचे सामान्य तिकीट मोबाईलवर

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा : भुसावळ मध्य रेल्वे विभागाचा पुढाकार

आॅनलाईन लोकमत
अमरावती : रेल्वे खिडक्यांवर अनारक्षित तिकीट मिळविण्यासाठी लांबलचक रांगेत तासन्तास उभे राहण्याची भानगड आता संपुष्टात आली असून, सामान्य तिकीट आता मोबाईलवर मिळणार आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यूटीएस अ‍ॅपद्वारे प्रवासी घरबसल्या तिकीट मिळवू शकणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल.
अनारक्षित तिकीट मोबाईलवर प्रवाशांना उपलब्ध कण्यात येणार असून, गुगल, गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, अ‍ॅपल स्टोअरवर जाऊन यूटीएस अ‍ॅप डाऊनलोड करून रजिस्ट झाल्यावर ते कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. येत्या काही दिवसांत ही सेवा भुसावळ मध्य रेल्वे विभागात सुरू होणार आहे. एक्स्प्रेस, मेल, पँसेजर गाड्यात अनारक्षित डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागांतर्गत खामगाव, शेगाव, बडनेरा, अमरावती, अकोला, मूर्तिजापूर, जळगाव, नांदुरा आदी रेल्वे स्थानकांचा समावेश असून, या स्थानकांच्या दोन किलोमीटर अंतरापर्यंत प्रवासी हे अ‍ॅप वापरून अनारक्षित तिकीट काढू शकतील. प्रवासादरम्यान तिकीट निरीक्षकांना छापील तिकीटऐवजी अ‍ॅपद्वारा काढलेली ईमेज दाखवविता येईल, अशी माहिती आहे.
असे मिळेल तिकीट
अनारक्षित तिकीट मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक असेल. मोबाईल क्रमांक, नाव, लिंग, जन्मतारीख, आयडी कार्ड क्रमांक, शहर आदी रजिस्टर केल्यानंतर वापरकर्त्याला एसएमएसद्वारा लॉग इन आयडी व पासवर्ड मिळेल. आर वॉलेट- प्रवासी आर वॉलेट वापरून तिकिटांची रक्कम भरू शकता येईल. यूटीएस आॅन मोबाईल डॉट इंडियन डॉट रेल डॉट जीओव्ही डॉट इन वापरून रिचार्ज केले जाऊ शकेल, असे एका रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.

अनारक्षित तिकीट मिळविण्यासाठी अ‍ॅप डाऊनलोड करणे अनिवार्य आहे. पासवर्ड मोबाईल क्रमांक असेल. रिचार्ज करून तिकीटांची रक्कम भरता येईल. हल्ली ही सुविधा सुरू झाली नाही; तथापि लवकरच ती सुरू होईल.
- शरद सयाम,
मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक, बडनेरा

Web Title: Railway general tickets on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.