रेल्वे गेटकीपरला मारहाण, पाच अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:18 PM2019-06-30T22:18:35+5:302019-06-30T22:19:06+5:30
नजीकच्या रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरून जयपूर सिंकदराबाद एक्स्प्रेस गाडी जात असताना गेटकिपरने रेल्वे गेट बंद केले. दरम्यान रेल्वे गेट का बंद करता असे म्हणून एका कारमधील पाच जणांनी गेटकिपरलाच मारहाण केली. तरही समोरून येणाऱ्या रेल्वेला थांबवून हजारो लोकांचे प्राण वाचविल्याची घटना दुपारी ४.३० वाजता घडली. यासंदर्भात वरूड पोलीसांनी पाचही युवकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : नजीकच्या रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरून जयपूर सिंकदराबाद एक्स्प्रेस गाडी जात असताना गेटकिपरने रेल्वे गेट बंद केले. दरम्यान रेल्वे गेट का बंद करता असे म्हणून एका कारमधील पाच जणांनी गेटकिपरलाच मारहाण केली. तरही समोरून येणाऱ्या रेल्वेला थांबवून हजारो लोकांचे प्राण वाचविल्याची घटना दुपारी ४.३० वाजता घडली. यासंदर्भात वरूड पोलीसांनी पाचही युवकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.
माहितीनुसार, धीरज प्रभाकर बरडे (३०, रा. धापेवाडा ता. सावनेर), ज्ञानेश्वर बबनराव पानपते ३२ रा. ब्रम्हपुरी, मंगेश अजाबराव उईके ३५ रा. कळमेश्वर, धमेंद्र पंजाबराव लोणकर (२७ रा. सांवगी), विशाल पुरुषोत्तम गोतमारे (२७, रा. घोराड ता. कळमेश्वर जि. नागपूर) अशी आरोपींची, तर प्रमोद कपले (३०, रा. वरुड) असे जखमी कर्मचाºयाचे नाव आहे. रेल्वे गाडी येणार म्हणून रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे गेट बंद होत असताना नागपूरकडे जाणारी कार क्र.एम.एच ३१ डीसी ४५८६ ने आरोपी वरूडहून येत होते. रेल्वे गेट का बंद केले म्हणून रेल्वेलाईनवर गाडी उभी केली. तेव्हा या गेटकिपरने गाडी काढा म्हणून हटकले असता, या युवकांनी दारूच्या बॉटलने आणि लोखंडी रॉडने गेटकिपर प्रमोद कपले यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तेथे उपस्थित नागरिकांनी पोलिसांना सूचना केली. पळून जाणाºया आरोपीच्या गाडीचा पाठलाग करून पोलीस आणि नागरिकांंनी चारचाकी वाहन पकडले. यासंदर्भात वरूड पोलिसांनी पाचही मद्यपी युवकावर शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले.
कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने अनर्थ टळला
रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवर गेटकिपरने गेटबंद केल्याने पाच टवाळखोरांनी युवकांनी गेटकिपरला रॉड आणि दारुच्या बॉटलने मारहाण करून गंभीर जखमी केले. हा प्रकार होऊनसुद्धा दुर्घटना होऊ नये म्हणून कशीबशी सुटका करु़न रेल्वेचालकाला सुचना दिली आणि रेल्वे थांबविली. यामुळे मोठा अनर्र्थ टळून हजारो प्रवाशांसह नागरिकांचे तसेच आरोेपींचेसुध्दा प्राण वाचले.