रेल्वेत बोगस कर्मचाऱ्यांची शोधमोहीम

By admin | Published: March 8, 2016 12:14 AM2016-03-08T00:14:40+5:302016-03-08T00:14:40+5:30

रेल्वे प्रशासनात बनावट कागदपत्रे सादर करून अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील जागा काबीज करणाऱ्या बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

Railway search bogus employees search | रेल्वेत बोगस कर्मचाऱ्यांची शोधमोहीम

रेल्वेत बोगस कर्मचाऱ्यांची शोधमोहीम

Next

टास्क फोर्स गठित : मुंबई विभागांतर्गत कागदपत्रे तपासणार
अमरावती : रेल्वे प्रशासनात बनावट कागदपत्रे सादर करून अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील जागा काबीज करणाऱ्या बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता टास्क फोर्स गठित करण्यात आला. ही चमू मुंबई विभागांतर्गत बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणार आहे.
रेल्वे प्रशासनात बनावट कागदपत्रे सादर करून बोगस अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याची तक्रार थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे देण्यात आली आहे. बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भरणा हा केवळ मुंबई विभागापुरताच नसून तो देशभरात पसरला असल्याचे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने म्हटले आहे. विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील बनावट कागदपत्रे सादर करुन मोक्याचा जागा बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. रेल्वेत बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी बडे अधिकारी असल्यामुळे बोगस कर्मचाऱ्यांचे शुद्धिकरण होत नाही, असे तक्रारीत नमूद आहे. रेल्वेत ज्यांना नोकऱ्या मिळणे अपेक्षित होते, त्यांच्या जागी बनावट कागदपत्रे सादर करून अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून रेल्वेत बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांना फावत आहे. मात्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू करण्याचे निर्देश मध्य रेल्वे मुंबई विभागाचे महाप्रबंधकांना दिले आहे. मुंबई विभागातील पुणे, सोलापूर, भुसावळ, मुंबई व नागपूर या विभागांतर्गत येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची जात पडताडणीचे कागदपत्रे तपासणी करण्यासाठी टॉस्क फोर्स गठित करण्यात आले आहे. पाचही विभागासाठी स्वतंत्र पथक आहे. अमरावती व बडनेरा रेल्वेस्थानकावरसुद्धा मोठ्या प्रमाणात बोगस अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याची तक्रार यापूर्वीच भुसावळ रेल्वे विभागाचे प्रबंधक गुप्ता यांच्याकडे देण्यात आली आहे.

जात पडताळणी विभागाचा कारभार कासवगतीने
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करुन नोकरी बळकाविण्याची अनेक प्रकरणे रेल्वेत उघडकीस आली आहेत. मात्र, या प्रकरणांविषयी जात पडताळणी विभागात तक्रारी दाखल असताना निर्धारित वेळेत निकाल लागत नसल्याचा आक्षेप आहे. एकट्या अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील १९ बनावट कागदपत्रांची प्रकरणे प्रलंबित आहेत. जात पडताळणी विभागाचा कारभार कासवगतीने सुरु असल्याचा आरोप आहे.

रेल्वेत बनावट कागदपत्रे सादर करुन नोकरी बळकाविणाऱ्या बोगस अधिकारी, कर्र्मचाऱ्याविरुद्धचा लढा सुरु आहे. घटनाबाह्यरित्या नियुक्त अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी न्यायालयीन आणि प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. टास्क फोर्स गठित झाल्यामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत.
- नंदराज मघाडे, रेल्वे कर्मचारी, बडनेरा

Web Title: Railway search bogus employees search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.