रेल्वे स्टेशन मार्ग अतिक्रमणात

By admin | Published: May 12, 2016 12:24 AM2016-05-12T00:24:38+5:302016-05-12T00:24:38+5:30

संत गजानन महाराज मंदिर ते रेल्वे स्टेशन चौकापर्यंत किरकोळ विक्रेत्यांनी व ईतर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अतिक्रमण केले असून ....

Railway station route encroachment | रेल्वे स्टेशन मार्ग अतिक्रमणात

रेल्वे स्टेशन मार्ग अतिक्रमणात

Next

किरकोळ विक्रेते, व्यावसायिकांचा हस्तक्षेप : अपघात घडल्यास जबाबदार कोण ?
अमरावती : संत गजानन महाराज मंदिर ते रेल्वे स्टेशन चौकापर्यंत किरकोळ विक्रेत्यांनी व ईतर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अतिक्रमण केले असून या रस्त्याचा श्वास महानगरपालिकेने मोकळा करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. या ठिकांनी दोन ते तीन लोकांनी भररस्त्यावर दुचाकी दुरुस्तीचे गॅरेच थाटले आहे. त्यामुळे हा मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक व्यावसायिकांनी अर्ध्या रस्त्यांपर्यंत अतिक्रमण थाटले आहे. या इर्विन चौक व राजकमल चौक, बसस्थानक चौकाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे या रस्त्यांवरुन हजारो वाहने ये-जा करतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्याच्या कडेला वाहने दुरुस्ती करण्यात येत असल्याने या ठिकांनी नेहमीच किरकोळ अपघातसुध्दा घडतात. येथून अनेक जड वाहने जात असल्याने मोठा अपघाताची शकयता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन पथकाने कारवाई करणे अपेक्षित आहे . (प्रतिनिधी)

पोलिसांनी कारवाई करावी
येथे कामानिमित्त आलेले नागरिक कुठेही रस्त्यावर बेशिस्त वाहने लावतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या ठिकांनी वाहतूक पोलिसांचे कुठलेही नियंत्रण राहिले नाही. बेशिस्त वाहतूक व्यवस्था असल्यामुळे या ठिकांनी अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्या गॅरेज चालकांविरुद्ध कारवाई का नाही?
सर्व नियम धाब्यावर बसवून बेशिस्तपणे रस्त्यांपर्यंत वाहने पार्किंग केली जात आह़े या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून वाहने दुरुस्तीचे गॅरेज लावण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. या गॅरेजच्या चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Railway station route encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.