Railway Update: अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह तीन गाड्या १४ व १५ ऑगस्टला रद्द

By Atul.jaiswal | Published: August 9, 2022 05:24 PM2022-08-09T17:24:09+5:302022-08-09T17:24:55+5:30

Railway Update: मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाअंतर्गत येत असलेल्या पाचोरा रेल्वेस्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरु करण्यात येणार असल्याने मुंबई ते हावडा या व्यस्त मार्गावरील काही एक्स्प्रेस गाड्या १३, १४ व १५ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.

Railway Update: Three trains including Amravati-Mumbai Express canceled on August 14 and 15 | Railway Update: अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह तीन गाड्या १४ व १५ ऑगस्टला रद्द

Railway Update: अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह तीन गाड्या १४ व १५ ऑगस्टला रद्द

googlenewsNext

- अतुल जयस्वाल 

अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाअंतर्गत येत असलेल्या पाचोरा रेल्वेस्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरु करण्यात येणार असल्याने मुंबई ते हावडा या व्यस्त मार्गावरील काही एक्स्प्रेस गाड्या १३, १४ व १५ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोला रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह तीन गाड्यांचा समावेश असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

भूसावळ मंडळ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. १२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १४ ऑग्स्ट रोजी प्रस्थान स्थानकावरूनच रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र. १२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस ही परतीची गाडी १५ ऑगस्ट प्रस्थान स्थानकावरूनच रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र. १२१३६ नागपूर-पुणे त्रिसाप्ताहिक एक्सप्रेस १३ ऑगस्ट रोजी नागपुर येथून, तर १२१३५ पुणे-नागपूर त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १४ ऑगस्ट रोजी आपल्या प्रस्थान स्थानकांवरून रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय गाडी क्र. १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस १४ ऑगस्ट रोजी प्रस्थान स्थानकावरून धावणार नाही. तसेच १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १५ ऑगस्ट रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे.

Web Title: Railway Update: Three trains including Amravati-Mumbai Express canceled on August 14 and 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.