श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे थांबणार रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:39 PM2018-12-14T22:39:01+5:302018-12-14T22:39:30+5:30
महानुभावपंथीयांची काशी म्हणून भारतभर प्रख्यात असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूर या गावात दोनशेच्या जवळपास तीर्थस्थान आहेत. महाराष्ट्रातून नव्हे, तर देशातून येणारे लाखो भक्त रोज दर्शनासाठी येतात. त्यामुळे नरखेड पॅसेंजर रेल्वे गाडीचा थांबा श्रीक्षेत्र रिद्धपूर प्लॅटफॉर्मवर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान समिती व रिद्धपूर ग्रामपंचायत व ग्रामवासीयांच्यावतीने येथील प्लॅपफार्मवर श्रीमद् भगवत गीता शांतीपाठ गायन करून शांततेत रेल रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी/रिद्धपूर : महानुभावपंथीयांची काशी म्हणून भारतभर प्रख्यात असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूर या गावात दोनशेच्या जवळपास तीर्थस्थान आहेत. महाराष्ट्रातून नव्हे, तर देशातून येणारे लाखो भक्त रोज दर्शनासाठी येतात. त्यामुळे नरखेड पॅसेंजर रेल्वे गाडीचा थांबा श्रीक्षेत्र रिद्धपूर प्लॅटफॉर्मवर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान समिती व रिद्धपूर ग्रामपंचायत व ग्रामवासीयांच्यावतीने येथील प्लॅपफार्मवर श्रीमद् भगवत गीता शांतीपाठ गायन करून शांततेत रेल रोको आंदोलन करण्यात आले.
रिद्धपूर येथील शेतकऱ्यांना शेतमाल मोठ्या शहरात विकण्यास नेण्यासाठी रेल्वे थांबा नसल्याने अडचण भासत आहे. तथापि, देवदर्शनासाठी देशभरातून येणाºया भाविकांनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांनी रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार स्वत: श्रमदान करून कच्चा प्लॅटफॉर्म तयार करून दिला. त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पॉट निरीक्षण करून समाधान व्यक्त केले होते. त्यानुसार रिद्धपूर येथे रेल्वे थांबा देण्यात येऊन रेल्वे गाडी थांबविण्याची मागणी झाली. परंतु, रेल्वे प्रशासनाच्यावतीने कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने शेवटी श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान समिती व रिद्धपूर ग्रामवासियांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन शुक्रवार १४ डिसेंबर रोजी तीर्थ सेवा समितीचे वार्इंदेशकर बाबा, प्रमोददादा अमृते, तळेगावकर बाबा, प्रमोद हरणे, रिद्धपूरचे सरपंच गोपाल जामठे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जावरकर, सचिन डवके, सुरेश सवई, राजेश डरंगे, गजानन पोहोकार, पाचराऊत बाबा, विश्वनाथ बाबा, डोळसकर बाबा, राहुल दादा, दयालमुनी बाबा, महेकराज बाबा, सायराज बाबा, वामनराव चरपे, रामभाऊ श्रीराव, महेश मुंदडा व गावातील नागरिक यांच्या नेतृत्वात श्रीमद् भगवतगीता शांतीपाठ गायन करून रेल्वे रोको आंदोलन करत असताना नागपूर येथील वाणिज्य प्रबंधक वानखडे यांनी सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करून सांगितले की, सीसीएम मोठ्या अधिकाºयांची या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे रेल्वे प्लॅटफार्म तयार करण्याकरिता सीसीएम या रेल्वे अधिकाºयांची प्रस्तावावर स्वाक्षरी करून दिल्लीला पाठविण्यात आलेली आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे लवकरच रेल्वे प्लॅटफार्म तयार होऊन रेल्वे थांबासुद्धा देण्यात येणार आहे, असे नागपूर येथून आलेले वाणिज्य प्रबंधक वानखडे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले असता, आंदोलनकर्त्यांकडून रेल रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामध्ये गावातील नागरिकांनी व महंतांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.