पावसाने दिलासा पण उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:25 AM2019-07-29T01:25:35+5:302019-07-29T01:25:55+5:30

जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या झडसदृश स्थितीमुळे वाढ खुंटलेल्या पिकांना दिलासा मिळाला तरी जुलैमधील १७ दिवसांच्या ओढीमुळे किमान एक लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट कायम आहे.

Rain is comforting but productivity declines | पावसाने दिलासा पण उत्पादनात घट

पावसाने दिलासा पण उत्पादनात घट

Next
ठळक मुद्देदुबार पेरणीचे संकट कायम : तिसऱ्या दिवशी सार्वत्रिक ३१.६ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या झडसदृश स्थितीमुळे वाढ खुंटलेल्या पिकांना दिलासा मिळाला तरी जुलैमधील १७ दिवसांच्या ओढीमुळे किमान एक लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट कायम आहे. उशिरा पावसामुळे अल्पावधीतील पिकांच्या सरासरी उत्पादनात मोठी घट येणार आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत सहा लाख ६८,८८६ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. ही ९१ टक्केवारी आहे. जिल्ह्यात अद्यापही ७० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. मात्र, पेरणी झालेल्या झालेल्या क्षेत्रामधील किमान एक लाख हेक्टरमधील पिकांना मोड आल्यामुळे दुबार पेरणीचे संकट कायम आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरसरी ३१.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक ५७.५ मिमी तर मोर्शी तालुक्यात ४७.७ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, अमरावती तालुक्यात २६ मिमी, भातकुली २३.०१, नांदगाव खंडेश्वर ३१, चांदूर रेल्वे २४.०१, धामणगाव रेल्वे ३१, तिवसा ३६.७, मोर्शी ४७.७, वरूड ३९.९, अचलपूर २६.५, चांदूरबाजार ३९.६, दर्यापूर २४.८, अंजनगाव सुर्जी १२.५, धारणी २२.०३ व चिखलदरा तालुक्यात ५७.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात चुरणी महसूल मंंडळात ८१.०२, तर अंबाडा मंडळात ७१.०४ मिमी पावसाने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वाधिक २,६६,११६ हेक्टर कपाशी, २,४३,२९३ हेक्टरमध्ये सोयाबीन, धान ५,६०३ हेक्टर, ज्वारी १३,०६५ हेक्टर, १,०६,४९५ हेक्टरमध्ये तूर, १२,४२३ हेक्टरमध्ये मूग, ५,६३४ हेक्टरमध्ये उडीदाची पेरणी झालेली आहे.

आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचे संकेत
हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै ते १ आॅगस्ट दरम्यान एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यात आहे. त्यामुळे ३१ तारखेनंतर पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात भरपूर प्रमाणात पाऊस राहील तसेच २९ व ३० रोजी पूर्व विदर्भात सार्वत्रिक, तर पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे.

दमयंती, माडू नदीला पूर
मोर्शी - तालुक्यातील दमयंती, नळा, माडू नद्यांना संततधार पावसाने पूर आला आहे. तालुक्यात ७२ तासांपासून पाऊस सुरू असल्याने माडू नदीला ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर आला.

Web Title: Rain is comforting but productivity declines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस