आणखीन सात दिवस विदर्भात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:43+5:302021-09-11T04:14:43+5:30
अमरावती: गेल्या पाच ते सहा दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या तीन ते चार दिवस बहुतांश जिल्ह्याला पावसाने ...
अमरावती: गेल्या पाच ते सहा दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या तीन ते चार दिवस बहुतांश जिल्ह्याला पावसाने झोडपले. त्यामुळे सिंचन प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा साचला असला तरी हा पाऊस पिकांसाठी धोकादायक ठरला. आणखीन सात दिवस विदर्भात पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे; मात्र पावसाची तीव्रता कमी राहणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सर्व जिल्ह्यात हलका ते मध्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. १२ सप्टेंबर रोजी अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस तर पूर्व विदर्भात बरेच ठिकाणी पावसाचे आगमन होईल. १३ ते १४ सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता तर पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल. १५ ते १७ सप्टेंबर रोजी विदर्भात बरेच ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे मत अनिल बंड यांनी व्यक्त केले.