नक्षत्राच्या वाहनाप्रमाणे पावसाचे प्रमाण
By Admin | Published: May 27, 2014 11:21 PM2014-05-27T23:21:20+5:302014-05-27T23:21:20+5:30
हवामानशास्त्र कितीही प्रगत झाले तरी पावसाचे अंदाज नेहमी चुकताना दिसतात. मात्र शेतकर्यांना अवगत असलेले प्राचीन ज्ञान सहसा चुकीचे ठरत नाही. या शास्त्राला लिखित स्वरूप नसले
सुरेश सवळे - चांदूरबाजार हवामानशास्त्र कितीही प्रगत झाले तरी पावसाचे अंदाज नेहमी चुकताना दिसतात. मात्र शेतकर्यांना अवगत असलेले प्राचीन ज्ञान सहसा चुकीचे ठरत नाही. या शास्त्राला लिखित स्वरूप नसले तरी पावसाचे तंतोतंत भाकीत करणारी मंडळी गावोगावी असतात. नक्षत्रांवरून पाऊस जोडणारी ही कला जितकी उपयुक्त तितकीच मनोरंजक आहे. जुलमी, दाहक ग्रीष्मापाठोपाठ होणारे वर्षाराणीचे आगमन काही दिवसात होत आहे. आकाशाला झाकोळून टाकणारे कृष्णमेघ वर्षाराणीच्या आगमनाची ग्वाही देत आहेत. वारा धुंदपणे वाहू लागत असून काही वेळा आकाशातून धरतीवर अमृतबिंदू बरसत आहेत. तहानलेली धरती ते पाणी घटाघटा पिऊन टाकत असून आनंदाने पुण्यकित होत आहे. त्यामुळे धरतीचा आनंद मृदगंधाच्या रुपाचे सर्वत्र दरवळत आहे. आता सर्वसामान्य नागरिकापासून ते बळीराजापर्यंत सर्वांनाच प्रतिक्षा लागून राहिली आहे ती मृग नक्षत्राच्या आगमनाची ! ती वेळ आता जवळ आली असून दि. ७ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होत आहे.