दर्यापूरला वादळी पावसाचा तडाखा

By admin | Published: June 3, 2016 11:59 PM2016-06-03T23:59:45+5:302016-06-03T23:59:45+5:30

शहराला शुक्रवारी वादळी पावसाचा तडाखा बसला. प्रचंड वादळामुळे काही क्षणापुरते नागरिक भयभीत झाले होते.

Rainfall of torrential rains at Daryapur | दर्यापूरला वादळी पावसाचा तडाखा

दर्यापूरला वादळी पावसाचा तडाखा

Next

तालुक्यात अनेक झाडे कोसळली : व्यावसायिकांची दुकाने व घरांवरील टिनपत्रे उडाली
दर्यापूर : शहराला शुक्रवारी वादळी पावसाचा तडाखा बसला. प्रचंड वादळामुळे काही क्षणापुरते नागरिक भयभीत झाले होते. येथील आगाराजवळ चारचाकी वाहनावर झाड कोसळले तर तहसीलजवळील दोन दुचाकीवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. दर्यापूर-थिलोरी मार्गावर चार ते पाच झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. हा प्रकार ५ ते ५.३० वाजतादरम्यान घडला. परिसरात किरकोळ गारपीटदेखील झाल्याची माहिती आहे.
दिवसभर उन्हाचा तडाखा असताना नागरिकांच्या जीवाची लाहीलाही झाली. परंतु अचानक ५ वाजतादरम्यान चक्रीवादळ आले. वादळासह पाऊसही असल्यामुळे नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. बसस्थानक चौकातील अनेक व्यवसायिकांचे दुकानावरील छपरे उडाली काहींचे कपडे व साहित्यही उडून नुकसान झाले. येथील दोन पानटपऱ्या वादळामुळे रस्यांवर आल्या होत्या. मूर्तिजापूर मार्गावरील गजानन महाराज मंदिराजवळील पंताजली दुकानावर झाड कोसळले, तर साईनगर इंजिनिअर होले यांच्या घराजवळही झाड पडले होते. शहरात ठिकठिकाणी लोकांच्या घरावरील टीन उडाले असून वृत्त लिहिस्तोवर कुठलीही मोठी हानी निदर्शनास आली नाही. मात्र, प्रबोधन विद्यालया जवळील लिंबाचे झाड कोसळले तर इंगळे यांच्या घरावरील टीन पतळे उडाली. सचिन गोमासे यांच्या घराचे उडाले असून योगेश हिंगणकर यांच्या घराच्या भिंतीला तडा गेले आहे.(प्रतिनिधी)

वादळामुळे वृक्षही
उन्मळून पडले
चक्रीवादळामुळे बसस्थानक चौकात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर झाड पडून वाहनाचे नुकसान झाले आहे. तहसीलजवळ उभ्या असलेल्या झाडाखालील दोन दुचाकी आल्याने मोठे नुकसान झाले. या मार्गावर एक मिनीट बोराएवढी गार पडल्याचे प्रथम दर्शनींनी सांगितले. साईनगर येथील वासुदेव होले यांच्या घरावर बाभळीचे झाड कोसळले बसस्थानक चौकातील. कोकीळाबाई गांवडे महिला महाविद्यालयाचे प्रवेशद्वारही वाकले आहे. अब्दूल आसिक यांच्या चप्पल विक्रीच्या दुकानाचे शेड उडाले आहे. तर दीपक कोल्हे यांच्या चारचाकी वाहनावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. नगरपालिकेसमोर उभी असलेली सुधाकर हातेकर यांच्या दुचाकीवर झाड पडल्याने त्यांचेही प्रचंड नुकसान झाले.

Web Title: Rainfall of torrential rains at Daryapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.