पावसामुळे विभागातील ३२१ किमीचे रस्ते, १८१ पूल क्षतिग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:14 AM2021-09-18T04:14:22+5:302021-09-18T04:14:22+5:30

(कॉमन) संदीप मानकर - अमरावती : सप्टेंबर महिन्यात विभागातील पाचही जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच अनेक पुलांवरून पाणी वाहिल्याने ...

Rains damaged 321 km of roads and 181 bridges in the division | पावसामुळे विभागातील ३२१ किमीचे रस्ते, १८१ पूल क्षतिग्रस्त

पावसामुळे विभागातील ३२१ किमीचे रस्ते, १८१ पूल क्षतिग्रस्त

Next

(कॉमन)

संदीप मानकर - अमरावती : सप्टेंबर महिन्यात विभागातील पाचही जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच अनेक पुलांवरून पाणी वाहिल्याने पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील तात्पुरत्या स्वरूपात ३२१.८५ किमीचे रस्ते खराब झाले आहेत. १८१ पूल क्षतिग्रस्त ठरल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाने दिली.

अकोला जिल्ह्यात पावसामुळे १८२.३० किमी रस्त्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्याची तातपुरत्या स्वरूपात डागडुजी करणे तसेच पुलांची दुरुस्ती करण्यासाठी निधी मिळावे, याकरिता ३०७२.९३ लाखांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला पाठविला.

अमरावती जिल्ह्यातील ५५.५० किमी, अकोला १८२.३० किमी, वाशिम २१.१० किमी, यवतमाळ ४७.३९ किमी तयार बुलडाणा जिल्ह्यात १५.५६ किमीचे रस्ते उखडले आहे. अनेक मार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तथा खड्डे बुजविणे गरजेचे आहे.

जिल्हा रस्ते किमी क्षतिग्रस्त पूल नुकसान (लाखात)

अमरावती ५५.५० ४७ ११२६.०३

अकोला १८२.३० ४४ १२८८

वाशिम २१.१० ३४ १४८.७२

यवतमाळ ४७.३९ २९ ३२१.९९

बुुुलडाणा १५.५६ २७ १८८.२५

एकूण ३२१.८५ १८१ ३०७२.९३

बॉक्स :

२११ पुलांच्या कामांचा प्रस्ताव

विभागात २११ क्षतिग्रस्त पूल कायमस्वरूपी दुरुस्तीकरिता प्रस्ताव बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. रस्ते, पुलाचे तात्पुरती कामे तसेच पुलांचे कायमस्वरूपी कामांसाठी एकूण ३८०.३६ कोटींची आवश्यकता असून त्याचा एकत्रित प्रस्ताव बांधकाम विभागाने शासनाकडे सादर करून निधीची मागणी केली आहे.

कोट

पावसाळ्यामुळे विभागात रस्त्याचे व पुलांचे मोठे नुकसान झाले. त्याचा एकत्रित प्रस्ताव शासनाकडे पाठविला. ज्या पुलांचे मोठे नुकसान झाले, ती कामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार कामे केली.

- गिरीश जोशी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती

Web Title: Rains damaged 321 km of roads and 181 bridges in the division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.