रिपाइंचा जिल्हाकचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 09:53 PM2017-09-14T21:53:10+5:302017-09-14T21:53:43+5:30
मोर्शी तालुक्यातील शिरखेडचे ठाणेदार नितीन चव्हाण यांनी जाणीवपूर्वक चुकीची कारवाई केल्याने त्यांना तत्काळ निलंबित करावे, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मोर्शी तालुक्यातील शिरखेडचे ठाणेदार नितीन चव्हाण यांनी जाणीवपूर्वक चुकीची कारवाई केल्याने त्यांना तत्काळ निलंबित करावे, यासह इतर मागण्यांसाठी गुरूवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले आहे.
१४ सप्टेंबर रोजी कमलताई गवई, जिल्हा संघटक अमोल इंगळे, दीपक सरदार यांच्या नेतृत्वात इर्विन चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अडगाव येथील स्वप्निल बनसोड नामक विद्यार्थ्याला ठाणेदार नितीन चव्हाण यांनी कोणतीही शहानिशा न करता राजकीय द्वेष भावनेतून गावगुंड ठरवून त्याचा तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी तळवी यांच्याकडे पाठविला असता तोच प्रस्ताव उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांच्याकडे पाठवून सी.आर.पी.सी कलम १४४ नुसार तडीपारीचा आदेश दिला. स्वप्निल हा पत्रकारिता पदविकेचा विद्यार्थी असून त्यावर पोलीस ठाण्याअंतर्गत कोणताही दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद नाही. त्यामुळे तडीपारीचा आदेश हा चुकीचा असून विद्यार्थ्याचे जीवन बर्बाद करणारा आहे. चुकीच्या पद्धतीने केलेला आदेश लक्षात घेता असे यापूर्वी प्रकार केल्याचा आरोप रिपाइंच्यावतीने करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाला दोषी असलेल्या ठाणेदार नितीन चव्हाण, एसडीपीओ तडवी, एसडीओ कडू या तीनही अधिकाºयांना निलंबित करावे, अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी करावी, मुस्लीम समाजावर होणारा अन्याय दूर करावा, शेतकºयांना स्वाभिनाथन आयोग लागू करावा, महापालिका घरकूल योजनेत द्रारिद्ररेषेखालीत प्रमाणपत्राची अट रद्द करावी, अशी मागणी कमलताई गवई यांनी केली. दरम्यान यासंदर्भात योग्य कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
आंदोलनात मनोज वानखडे, राहुल भालेराव, सविता भटकर, गणेश तेलगोटे, गौतम मोहोड, संजय गायकवाड, आतिष डोंगरे, शुभम बोरकर, प्रमोद गवई, राजेंद्र जोशी, प्रशांत वाकोडे, करूण गायकवाड आदीसह मोठ्या संख्यने नागरिक सहभागी झाले होते.