अमरावतीत राज ठाकरे यांचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 02:38 PM2022-09-21T14:38:10+5:302022-09-21T14:40:39+5:30
राज ठाकरे यांचे मिशन विदर्भ
मनीष तसरे
अमरावती : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय अमरावती दौऱ्यावर असून राज ठाकरे अमरावतीच्या हॉटेल मध्ये ते पश्चिम विदर्भातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. या ठिकाणी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.
या ठिकाणी राज ठाकरे यांचं जोरदार असं स्वागत करण्यात आलं. आता या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतील हे सद्याच्या राजकीय घडामोडींच्या अनुषगाने महत्वाचे ठरणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राज ठाकरे हे मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता अमरावती शहरात दाखल झाले. यावेळी पंचवटी चौक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम होता. बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास राज ठाकरे यांनी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळाचे दर्शन घेतले.
दरम्यान, राज ठाकरे हे ४ दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर असून नागपूर, चंद्रपूरनंतर ते अमरावती जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन विदर्भ अंतर्गत विदर्भात मनसे पक्ष वाढ आणि पक्ष संघटना बळकटीसाठी त्यांच्या दौरा महत्वाचा मानला जात आहे.