राज ठाकरे यांचा विमानाऐवजी रेल्वेने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:40 PM2018-10-17T21:40:03+5:302018-10-17T21:40:26+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अमरावती दौऱ्यावर येताना सुरक्षा कारणास्तव विमानाऐवजी रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दर्शविली. ते मुंबई येथून अंबा एक्स्प्रेसच्या प्रथमश्रेणी वातानुकूलित स्वतंत्र डब्यातून आले.

Raj Thackeray's journey by rail instead of his aircraft | राज ठाकरे यांचा विमानाऐवजी रेल्वेने प्रवास

राज ठाकरे यांचा विमानाऐवजी रेल्वेने प्रवास

Next
ठळक मुद्देसुरक्षा कारणास्तव अंबा एक्स्प्रेसच्या स्वतंत्र डब्याचे आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अमरावती दौऱ्यावर येताना सुरक्षा कारणास्तव विमानाऐवजी रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दर्शविली. ते मुंबई येथून अंबा एक्स्प्रेसच्या प्रथमश्रेणी वातानुकूलित स्वतंत्र डब्यातून आले. त्यांच्या सोबतीला ३० जणांचा फौजफाटा असून, ८० हजार रुपयांत अवघी बोगीच त्यांनी आरक्षित केल्याची माहिती आहे.
राज ठाकरे हे विदर्भात १७ ते २२ आॅक्टोबर असे पाच दिवस दौºयावर आहेत. ते व्हीआयपी असले तरी त्यांनी सुरक्षा कारणास्तव रेल्वेने प्रवास केला. प्रथमश्रेणीचा वातानुकूलित स्वतंत्र डबा मिळावा, यासाठी ३० जणांच्या नावे त्यांनी तिकिटांचे आरक्षण केले होते. यात १० तिकीट प्रथमश्रेणी, तर २० तिकीट द्वितीय श्रेणीचे होते. एकाच वेळी प्रीमियम तात्काळ तिकिटांचे आरक्षण असल्यामुळे रेल्वे प्रशासनाला स्वतंत्र डब्याची व्यवस्था करावी लागली. एचए १ वातानुकूलित प्रथमश्रेणी स्वतंत्र डब्यातून ठाकरे हे स्वीय सहायकासह सुरक्षारक्षकांचा गराड्यात अमरावती रेल्वे स्थानकावर सकाळी पावणेआठला पोहचले.
रेल्वेने प्रवास करताना एकाच वेळी अधिक जण ठरावीक स्थळी जात असल्यास प्रीमियम तिकिटांचे आरक्षण करून स्वतंत्र डबा लावण्याची मागणी कुणालाही करता येते.

मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या महाप्रबंधक कार्यालयातून अंबा एक्स्प्रेसला प्रथमश्रेणीचा वातानुकूलित स्वतंत्र डबा लावण्याबाबत संदेश मिळाला होता. बुधवारी हा डबा परत आला आहे. याच डब्यातून राज ठाकरे यांचे आगमन झाले.
- आर. टी. कोटांगळे, प्रबंधक, अमरावती स्थानक

Web Title: Raj Thackeray's journey by rail instead of his aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.