राजापेठ हद्दीत जुगार पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:14 AM2021-04-28T04:14:47+5:302021-04-28T04:14:47+5:30
---------------------------------- पंचशीलनगरात जुगार पकडला अमरावती : बडनेरा पोलिसानी जुनी वस्तीतील पंचशीलनगरात कारवाई करून पाच लिटर हातभट्टीची गावठी दारू जप्त ...
----------------------------------
पंचशीलनगरात जुगार पकडला
अमरावती : बडनेरा पोलिसानी जुनी वस्तीतील पंचशीलनगरात कारवाई करून पाच लिटर हातभट्टीची गावठी दारू जप्त केली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. आरोपी विनोद गोविंदराव अडकने (४०, रा. पंचशील नगर बडनेरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
---------------------------
सुंदरलाल चौकातून अवैध दारू जप्त
अमरावती: फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील सुंदरलाल चौकातून अवैध दारू व दुचाकी असा एकूण २६ हजार ५२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. नानीया गोयनेया पवार (२४, रा. पारधी बेडा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक पुंडलीक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन राजमल्लु यांनी केली. पोलिसांनी १५०० रुपयांची हातभट्टीची दारू जप्त केली तसेच एक दुचाकीसुद्धा ताब्यात घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.