नागरिकांच्या सुविधेसाठी राजापेठ भुयारी मार्ग आजपासून करणार खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:50+5:302021-07-03T04:09:50+5:30

अमरावती : विविध अडथळ्यांत अडकलेल्या राजापेठ भुयारी मार्गाची आमदार रवि राणा यांनी शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. ...

Rajapeth subway will be opened from today for the convenience of citizens | नागरिकांच्या सुविधेसाठी राजापेठ भुयारी मार्ग आजपासून करणार खुला

नागरिकांच्या सुविधेसाठी राजापेठ भुयारी मार्ग आजपासून करणार खुला

Next

अमरावती : विविध अडथळ्यांत अडकलेल्या राजापेठ भुयारी मार्गाची आमदार रवि राणा यांनी शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. शनिवारी दुपारपासून हा भुयारी मार्ग नागरिकांच्या सेवेत खुला करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रलंबित कामे रात्री कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची तंबी राणा यांनी कंत्राटदारास दिली.

भुयारी मार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाले असून हा मार्ग सुरू झाल्यास या परिसरातील नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, गृहिणी आदी सर्वांची कायमस्वरूपी सोय होणार आहे. या भुयारी मार्गात तातडीने इलेक्ट्रिक लाईट, पादचारी जिने, स्टील रेल्लिंग, फुटपाथ आदी सुविधा आमदार राणा यांच्या सूचनेनुसार साकारण्यात येत आहेत. राजापेठवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या देवी तारामाता मंदिराला धक्का न लावता भाविकांना दर्शनासाठी त्रास होऊ नये, या उद्देशाने विशेष जिना तयार करून मंदिरासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे.

यावेळी उपायुक्त सुरेश पाटील, शहर अभियंता रवींद्र पवार, उपअभियंता सुभाष चव्हाण, मंगेश कडू, श्याम टोपरे,अभियंता शरद तिनखेडे, कंत्राटदार जुजर सैफी, सुनील राणा, नगरसेविका सुमती ढोके, युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे, नितीन बोरेकर, अजय मोरया, सचिन भेंडे, अनिल मिश्रा, पराग चिमोटे, अभिजित देशमुख, अवि काळे, नितीन तायडे, गौतम हिरे, सूरज मिश्रा, अमन गोलाइतकर आदी उपस्थित होते.

बॉक्स

देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते लोकार्पण- महापौर

राजापेठ भुयारी मार्गाचे लोकार्पण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. महापालिका व रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास जात आहे. पालकमंत्री व संबंधित सर्व आमदार, पदाधिकारी यांना बोलाविण्यात येणार आहे. या कामास्या लोकार्पणाचा मोठा सोहळा राहणार असल्याचे महापौर चेतन गावंडे यांनी सांगितले.

Web Title: Rajapeth subway will be opened from today for the convenience of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.