रुक्मिणीच्या माहेरी आज रिंगण, उद्या महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:48 PM2017-11-03T23:48:58+5:302017-11-03T23:49:26+5:30
रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यापुरात रविवारी शासकीय महापूजा होणार आहे. त्यापूर्वी शनिवार, ४ नोव्हेंबरला कुºहा रिंगण सोहळा रंगणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुºहा : रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यापुरात रविवारी शासकीय महापूजा होणार आहे. त्यापूर्वी शनिवार, ४ नोव्हेंबरला कुºहा रिंगण सोहळा रंगणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने वैष्णवजन शुक्रवारीच कौंडण्यपुरात मोठ्या संख्येने दाखल झाले.
भगवान श्रीकृष्णाची पत्नी देवी रुक्मिणीचे माहेर म्हणून कौंडण्यापूर नावारूपास आले आहे. येथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सव दहा दिवस भरतो. कार्तिक पौर्णिमेला अडीच दिवसांच्या मुक्कामाला पंढरीचा विठ्ठल येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे पंढरपूरप्रमाणेच कौंडण्यापुरात मोठी कार्तिक यात्रा भरते. लाखो वारकरी दहा दिवसांत येथे येतात. यानिमित्त कुºहा येथे ४ नोव्हेंबरला दिंड्यांचा रिंगण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात ५० ते ६० दिंड्या सहभागी होणार आहेत. कुºहा ते तिवसा मार्गातील श्रीकृष्ण मंगल कार्यालय नजीकच्या भव्य प्रांगणावर हा रिंगण सोहळा होईल. यानंतर या दिंड्या कौंडण्यपुराकडे प्रस्थान करतील. रात्री मोठ्या संख्येत भाविक त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतील.
कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थांनात ५ नोव्हेंबरला पहाटे ६ वाजता पालकमंत्री, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा होईल. सायंकाळी ५ ला गोकुळपुरीत दहीहंडी होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावे, भाविकांची इच्छा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे सपत्नीक पंढरपूरला शासकीय महापूजा करतात, त्याप्रमाणे कौंडण्यापुरातदेखील शासकीय महापूजा व्हावी, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर व वारकºयांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती. २०१३ पासून शासकीय महापूजा होते, मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा झाली नाही. ती व्हावी, अशी मागणी भाविक करीत आहेत.