मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 10:54 PM2018-08-26T22:54:54+5:302018-08-26T22:55:11+5:30

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीजणांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी बंदीजणांच्या हातावर राखी बांधताच त्यांचे अश्रू अनावर झाले. बहीण-भावाच्या नात्याची वीण गुंफणारा हा सोहळा संत गाडगे बाबा प्रार्थना मंदिरात घेण्यात आला.

Rakshabandhan in Central Jail | मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन

मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन

Next
ठळक मुद्देबंदीजणांचे अश्रू झाले अनावर : सामाजिक संघटनांच्या महिलांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीजणांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी बंदीजणांच्या हातावर राखी बांधताच त्यांचे अश्रू अनावर झाले. बहीण-भावाच्या नात्याची वीण गुंफणारा हा सोहळा संत गाडगे बाबा प्रार्थना मंदिरात घेण्यात आला.
कारागृहात बंदीजणांची सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या आहे. मात्र, उत्तुंग भिंतीआड हातून कळत-नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रूपात न्यायालयीन आदेशानुसार प्रायश्चित करीत असलेल्या बंदीजणांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम महिला संघटनांच्या पुढाकाराने पार पडला. सामाजिक संघटनाच्या महिलांनी बंदीजनांच्या हाती राख्या बांधावयास सुरूवात करताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. रक्ताचे नाते असलेल्या बहिणीची आठवण बंदीजणांना यावेळी आली. कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी अशोक जाधव, तुरूंगाधिकारीे सुनील जाधवश राजेंद्र ठाकरे, राजेंद्र वडते, सुभेदार गोपाळ नांदे आदी उपस्थित होते. योगिता लुल्ला, पदमा पुरी, मीनाक्षी करवाडे, ज्योती ठाकूर, राधा कांबळे, शालिनी श्रीराव, लिला उंबरकर,नंदा राऊत, ज्योती धामणकर, शारदा धामणकर, साधना चंदेल, मेघा भारती, ममता गुप्ता, बी.के. सीता दिदी, सुनीता दिदी, शुंभागी दिदी, संगीता लुंगे, श्रद्धा गहलोत आदी उपस्थित होत्या.

Web Title: Rakshabandhan in Central Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.