एकवीरा स्कूलमध्ये रक्षबांधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:17 AM2021-08-24T04:17:09+5:302021-08-24T04:17:09+5:30

-------------- मंगरूळ हद्दीतून मुलीला फूस लावून पळविले मंगरूळ दस्तगीर : नजीकच्या गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार २२ ...

Rakshabandhan at Ekvira School | एकवीरा स्कूलमध्ये रक्षबांधन

एकवीरा स्कूलमध्ये रक्षबांधन

Next

--------------

मंगरूळ हद्दीतून मुलीला फूस लावून पळविले

मंगरूळ दस्तगीर : नजीकच्या गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार २२ ऑगस्ट रोजी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. याप्रकरणी संदीप फकीरराव दुर्गे (२५) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-------------

रस्त्याच्या वादातून वृद्धेला काठीने मारहाण

वाठोडा शुक्लेश्वर : रस्त्याच्या वादातून अविनाश नत्थूजी जांभे, मारुती नत्थूजी जांभे व एका महिलेने काठीने डोक्यावर मारल्याची तक्रार ६५ वर्षीय महिलेने खोलापूर पोलीस ठाण्यात नोंदविली. १९ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

-------------

पेट्रोल संपले दुचाकी लंपास

अचलपूर : सूरज रमेश फिसके (रा. अब्बासपुरा) यांची एमएच २७ बीजी ७८९१ क्रमांकाच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने त्यांनी गोपी धाबापुढे उभी केली होती. तेथे भावाला दुचाकी घेण्यास बोलावले असता, ती आढळली नाही. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली. सरमसपुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

---------------

उतावली येथे दोन दुचाकींची धडक

धारणी : तालुक्यातील काकरमल येथील नितेश नंदकुमार भावे यांच्या दुचाकीला त्याच गावातील मन्साराम मांगीलाल मावस्करच्या दुचाकीची उतावली येथे सातव यांच्या शेताजवळ धडक बसली. २२ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

-------------------

वीजपुरवठा बंद इसमाला मारहाण

जरूड : वरूड तालुक्यातील शहापूर येथे प्रकाश बबनराव कविटकर यांनी वीजपुरवठा कापल्याबद्दल अमोल किसनराव सावरकर (४०) याच्याकडे विचारणा केली असता त्याने काठीने मारहाण करून जखमी केले. २२ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. प्रकाश हा २०० रुपये दरमहा दराने त्याच्याकडून वीजपुरवठा घेत होता. वरूड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Rakshabandhan at Ekvira School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.