सामाजिक न्याय विभागातर्फे रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 06:00 AM2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:05+5:30
भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करण्याच्या घटनेला यावर्षी ७० वर्षे पूर्ण झाली आहे. याअनुषंगाने आयोजित रॅलीची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील पुतळ्यापासून झाली.
अमरावती : संविधानदिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे २६ नोव्हेंबर रोजी शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभागी होऊन संविधान जागृतीचा संदेश दिला.
भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करण्याच्या घटनेला यावर्षी ७० वर्षे पूर्ण झाली आहे. याअनुषंगाने आयोजित रॅलीची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील पुतळ्यापासून झाली. प्रारंभी प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे, उपायुक्त सुनील वारे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सहायक आयुक्त मंगला मून, समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर ही रॅली मार्गस्थ झाली. रॅलीत विद्यार्थ्यांनी संविधान जागृतीचा संदेश देणारे फलक धरून हक्क-कर्तव्यांप्रति जागृतीपर घोषणाही दिल्या. महिंद्र विद्यालयासह अनेक शाळा व वसतिगृहांतील विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. सामाजिक न्यायभवन येथे रॅलीचा समारोप झाला. सामाजिक न्याय विभागाचे लक्ष्मण मैदरवाड, राजेश गरूड, समन्वयक श्रीकृष्ण पखाले, भरत राऊत, शिवाजी मकर, पवन साबळे, ज्योती मडावी, के. पी. चौधरी, प्रवीण पांडे, राजेंद्र खरपीकर आदी यावेळी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यालय
विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पीयूष सिंह, उपायुक्त प्रमोद देशमुख, तहसीलदार अनिल भटकर, वैशाली पाथरे व उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.